आमदारांपुढे मताधिक्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:34 PM2019-04-04T23:34:32+5:302019-04-04T23:34:37+5:30
अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गतवेळी भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्याची नोंद करीत कॉँग्रेसचा बालेकिल्ला ...
अविनाश कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गतवेळी भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्याची नोंद करीत कॉँग्रेसचा बालेकिल्ला हस्तगत केला होता. यंदा गटबाजीने हा पक्ष त्रस्त आहे. काही आमदारांनीच सुरुवातीला खासदारांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शविला होता. पक्षातील वातावरण शांत झाले असले तरी, आमदारांसमोर आता त्यांच्या मतदारसंघातील मताधिक्य टिकविण्याचे आव्हान राहणार आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातील गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहिला तर, भाजपचा आलेख चढता राहिला आहे. २00९ च्या निवडणुकीतही त्यांच्याकडे तीन आमदार होते आणि सध्याही तीनच आहेत, मात्र खासदारकीसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या संस्थाही भाजपने काबीज केल्यामुळे त्यांची ताकद गेल्या पाच वर्षात आणखी वाढली आहे. यंदाच्या निवडणुकीत ही ताकद अबाधित ठेवण्याचे आव्हान आहे. खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देऊ नये म्हणून काही आमदारांनीच विरोध केला होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हा वाद मिटला आहे. तरीही आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप आणि घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांना त्यांच्या मतदारसंघातील मताधिक्य टिकविण्याचे आव्हान राहणार आहे. या मताधिक्यावरच भाजपच्या उमेदवाराचे गणित अवलंबून आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगलीची जागा मिळाली असून, आघाडी धर्म पाळण्यासाठी राष्टÑवादीचे आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील तसेच कॉँग्रेसचे आ. विश्वजित कदम यांनाही त्यांच्या मतदारसंघातील मताधिक्य आघाडीच्या उमेदवाराला मिळवून देण्याचे आव्हान असणार आहे.
चित्र बदलेल का? कसे?
सांगली जिल्ह्यात भाजपने गेल्या दहा वर्षांत मोठी मुसंडी मारली आहे. मागील निवडणुकीत मोदी लाट होती, ती ओसरल्याचा राजकीय तज्ज्ञांचा सूर आहे.
मोदींच्या प्रभावाशिवाय सांगलीतील भाजपला ताकद दाखविण्याची वेळ आली आहे.
मतदारसंघातील चित्र तसेच राहणार की बदलणार याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत. तुल्यबळ उमेदवारांमुळे यंदा भाजपला ही निवडणूक फारशी सोपी राहिलेली नाही.
विधानसभांचे निकाल 2009
जागा भाजप काँग्रेस राष्टÑवादी बसप इतर
सांगली 45% 39%5% 0% 1% 15%
मिरज 56% 24% 0%% 1% 19%
पलूस-कडेगाव 0% 58% 0% 1% 39%
खानापूर 0% 42% 0% 1% 57%
तासगाव-क.म. 39% 0% 63% 2% 35%
जत 39% 0% 36% 1%
24%
विधानसभांचे निकाल 2014
जागा भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी इतर
सांगली 41% 34% 18% 2% 5%
मिरज 51% 16% 11% 6% 45%
पलूस-कडेगाव 425% 54% 1% 0.5% 2.5%
खानापूर 20% 24% 33% 18% 5%
तासगाव-क.म. 42% 2% 1% 53% 2%
जत 43% 32% 1% 18% 6%