सत्तांतरासाठी अनिलभाऊंसमोर खडतर आव्हान...-

By admin | Published: June 28, 2016 11:12 PM2016-06-28T23:12:43+5:302016-06-28T23:16:05+5:30

विटा नगरपालिका संभाव्य चित्र

Challenges before the Anilabhooma to govern ... | सत्तांतरासाठी अनिलभाऊंसमोर खडतर आव्हान...-

सत्तांतरासाठी अनिलभाऊंसमोर खडतर आव्हान...-

Next

दिलीप मोहिते -- विटा नगरपरिषदेत सध्या कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आ. सदाशिवराव पाटील गटाची एकहाती सत्ता आहे. त्यांच्या माध्यमातून लोकनेते हणमंतराव पाटील यांची तिसरी पिढी आज सत्तेत आहे. मागील निवडणुकीत माजी आ. पाटील यांचे विरोधक विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड यांनी कॉँग्रेसशी युती केली. तर शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी गायकवाड यांचे दुखावलेल्या कार्यकर्त्यांची एकत्रित मोळी बांधून सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. त्यामुळे नगरपरिषदेत सध्या माजी आ. पाटील यांच्या कॉँग्रेसचे १५, गायकवाड समर्थकांचे ५, तर आ. बाबर समर्थक ३ असे एकूण २३ नगरसेवक कार्यरत आहेत.
मात्र, पालिकेतील स्वाभिमानी विकास आघाडीतून विजयी झालेल्या तीन विरोधी नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांविरूध्द सभागृहात रान उठविल्याचे दिसून आले नाही. उलट सत्ताधारी सदाभाऊ व अशोकभाऊ यांच्या युतीतील अशोकराव गायकवाड यांच्या नगरसेवकांनीच बऱ्यापैकी काही ठरावांना विरोध करून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र गेल्या पाच वर्षात पाहावयास मिळाले.
दरम्यान, सुवर्णनगरी म्हणून परिचित असलेल्या विटा नगरपरिषदेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात असला तरी कॉँग्रेस व शिवसेना यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. शिवसेनेचे आ. बाबर यांनी गेल्या अनेक वर्षाच्या सदाभाऊंच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी आ. अनिलभाऊंनी धनुष्यबाणाचा दोर ताणला आहे. तर तीन पिढ्याची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी सदाभाऊंनी आपले मावळे सज्ज ठेवले आहेत. या निवडणुकीसाठी दोन्ही गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
विटा नगरपरिषदेने घरपट्टी व पाणीपट्टीसह विविध कर मालमत्ताधारकांकडून वसूल करण्यासाठी आॅनलाईन कर वसुली पध्दत सुरू केली आहे. घरबसल्या मालमत्ताधारकाला आपला कर आॅनलाईनवरून नगरपरिषदेच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. तसेच नाहरकत दाखल्यांसह विविध दाखले, मालमत्ता उतारे आदी संगणकीकृत करण्यात आले असून, एका खिडकीत ही सर्व कागदपत्रे तात्काळ उपलब्ध होत असल्याचे नागरिकांची सोय झाली आहे. तसेच इंदिरा आवास घरकुलच्या माध्यमातून नाममात्र किंमतीत पालिका प्रशासनाने दारिद्र्य रेषेखालील लोकांना घरे बांधून दिली आहेत.
यावेळी नगराध्यक्ष निवड थेट जनतेतूनच होणार असल्याने एका मतदाराला तीन मतदान करण्याचा अधिकार राहणार आहे. नगराध्यक्ष निवड जनतेतून होणार असल्याने आता या पदाला स्थैर्य आणि नगराध्यक्षाला काम करण्यास चांगली संधी मिळणार आहे. परिणामी शहराचा विकासही वेगाने होण्यास मदत होणार आहे.


नगराध्यक्ष निवडीबाबत ‘तोंडावर बोट..’
नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठीचे इच्छुक अद्याप ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेवून बसले आहेत. परिणामी, यावर्षीची विटा नगरपरिषदेची निवडणूक कॉँग्रेसच्या सत्ताधारी गटासह विरोधी शिवसेना पक्षालाही प्रतिष्ठेची व अस्मितेची ठरणार आहे.


कॉँग्रेसची एकहाती सत्ता
विटा नगरपरिषदेच्या राजकारणात माजी आ. सदाशिवराव पाटील व विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड हे प्रमुख राजकीय विरोधी गट यापूर्वी सक्रिय होते. परंतु, गत निवडणुकीत सदाभाऊ व अशोकभाऊ यांच्यात युती झाल्याने आ. अनिलभाऊ बाबर यांनी स्वतंत्र स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना आव्हान देऊन तीन नगरसेवक विजयी केले. आता कॉँग्रेसचे माजी आ. सदाभाऊ, अशोकभाऊ, विरोधी शिवसेनेचे आ. अनिलभाऊ बाबर यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. नगराध्यक्ष वैभव पाटील, अ‍ॅड. अजित व सुमित गायकवाड या सदाभाऊ आणि अशोकभाऊंच्या शिलेदारांविरूध्द विरोधी शिवसेनेचे सुहास बाबर, अमोल बाबर या युवा नेत्यांनी मोठी फिल्डिंग लावली आहे.

सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विटा शहराच्या राजकीय पटलावर नगरपरिषदेची निवडणूक ही जिल्ह्यात लक्षवेधी ठरत असते. या निवडणुकीसाठी सत्ताधारी कॉँग्रेस व विरोधी शिवसेना पक्षाने राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागले असून, सत्ताधारी गटाचे कार्यकर्ते व विरोधी गटाचे शिवसैनिक यांच्यात सोशल मीडियावर ‘निवडणूक वॉर’ सुरू झाले आहे. मात्र माजी आ. सदाशिवराव पाटील यांची गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांची सत्ता उलथवून टाकून सत्तांतर घडविण्यासाठी शिवसेनेचे आ. अनिलभाऊ बाबर यांची कसोटी लागणार आहे.

Web Title: Challenges before the Anilabhooma to govern ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.