सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप; ‘कृष्णे’च्या पाणीपातळीत किंचित वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 11:54 AM2024-07-30T11:54:55+5:302024-07-30T11:55:37+5:30

‘वारणे’तून पाच हजार क्युसेकने विसर्ग घटविला : पूल, रस्ते पाण्याखाली कायम

Chance of rain in Sangli district, A slight increase in the water level of Krishna | सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप; ‘कृष्णे’च्या पाणीपातळीत किंचित वाढ

सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप; ‘कृष्णे’च्या पाणीपातळीत किंचित वाढ

सांगली : कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून जिल्ह्यातही सोमवारी पावसाने उघडीप दिली. चांदोली धरणातून पाच हजारांनी विसर्ग कमी करून १२ हजार ३८५ क्युसेकने पाणी सोडले जात आहे. तर कोयनेतून ३२ हजार क्युसेक कायम आहे. कृष्णा नदीची सांगली आयर्विन पूल येथे सायंकाळी चार इंचाने पाणीपातळीत वाढ होऊन ३९.४ फूट झाली.

गेल्या चार दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने महापुराचा धोका टळला आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत सोमवारी काहीसी वाढ झाली. वारणा धरण क्षेत्रात चोवीस तासांत ७० मि.मी. पाऊस झाला धरणातून पाच हजारांनी विसर्ग कमी करून १२ हजार २८५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून ३२ हजार १०० क्युसेक विसर्ग कायम आहे. अलमट्टी धरणातील पाणीसाठा ६७.२५ टीएमसी झाला असून दोन लाख ७१ हजार क्युसेकने पाण्याची आवक असून सोमवारी २५ हजारांनी विसर्ग कमी केला आहे. तीन लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे.

शिराळा आणि वाळवा तालुक्यातील काही गावांत पावसाची रिमझिम सुरूच होती. धरणातून सोडण्यात येणारे पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत संथगतीने वाढ होत आहे. कृष्णा नदीची पातळी दिवसभरात अर्ध्या फुटाने वाढ झाली आहे. वारणा नदीच्या पाण्यातही काहीशी वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती कायम राहिली.

शिराळ्यात २६.७ मि.मी. पाऊस

जिल्ह्यात रविवारी सरासरी ६.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक २६.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज २.३ (४२८.६), जत ०.४ (२७२.४), खानापूर ७.१ (३४६.३), वाळवा ८.६ (६७३.७), तासगाव ३.८ (४२२.८), शिराळा २६.६ (१०३१.६), आटपाडी ४.९ (२५२.६), कवठेमहांकाळ १.४ (३७७.८), पलूस ४ (४६७.२), कडेगाव ९.३ (४५६.५).

‘कृष्णे’ची पाणीपातळी

ठिकाण - फूट इंचांमध्ये
कराड कृष्णा पूल २३.०८
बहे १०.०८
ताकारी ३९.३
भिलवडी ३९.०६
आयर्विन ३९.०४
राजापूर बंधारा ५३.०३

Web Title: Chance of rain in Sangli district, A slight increase in the water level of Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.