सांगली जिल्ह्यात पाणी संकटाची शक्यता, उन्हाळ्यात पाण्यावर 'इतके' कोटी खर्चणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 05:01 PM2023-04-08T17:01:47+5:302023-04-08T17:02:05+5:30
६६ गावांची तहान भागणार
सांगली : जिल्ह्यात जून महिन्याअखेरपर्यंत १८४ गावे आणि ८६१ वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई भासू शकते. संभाव्य पाणीटंचाई बघता नवीन विंधन विहीर घेणे, विहिरींचे अधिग्रहण आणि टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी चार कोटी २१ लाख रुपयांचा आराखडा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. परिणामी विहिरी, कूपनलिकांतील पाणी कमी होत आहे. भूगर्भातील पाणीपातळीही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी संकट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एप्रिल ते जूनपर्यंत काही गावांतील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
६६ गावांची तहान भागणार
एप्रिल ते जून या कालावधीत १०२ गावांमधील विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यातील १० गावे, जत ४० गावे, कडेगाव तीन गावे, कवठेमहांकाळ १६, खानापूर १६ गावे, मिरज १२ गावे, शिराळा सहा, तासगाव एक आणि वाळवा तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे. याबाबत नियोजन केले जात आहे.
१०२ विहिरींचे अधिग्रहण