Sangli: चांदोली धरण १०० टक्के भरले; पाण्याची चिंता मिटली, बळीराजा सुखावला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 03:01 PM2024-09-26T15:01:36+5:302024-09-26T15:01:52+5:30

सध्या धरणाच्या सांडव्यातून व पायथा वीजगृहातून वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग बंद

Chandoli Dam 100 percent full; The worry of water was solved | Sangli: चांदोली धरण १०० टक्के भरले; पाण्याची चिंता मिटली, बळीराजा सुखावला

Sangli: चांदोली धरण १०० टक्के भरले; पाण्याची चिंता मिटली, बळीराजा सुखावला

वारणावती : चांदोली धरण क्षेत्रात दरवर्षी चार ते पाच हजार मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होते. आजअखेर धरण क्षेत्रात ३७४१ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील वारणावती पर्जन्यमापण यंत्रावर झाली आहे. योग्य नियोजन व पाण्याच्या कमीअधिक केलेल्या विसर्गामुळेच चांदोली धरण यावर्षी ही १०० टक्के भरले आहे.

सध्या धरणाची पाणी पातळी ६२६.९० मीटरवर पोहचली आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले चांदोली धरण आज १०० टक्के भरले असून, धरणात सध्या ९७४.१८८ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. गेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रात ०४ मिमी पाऊस पडला आहे. यामुळे धरणात ५५३ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे.

सध्या धरणाच्या सांडव्यातून व पायथा वीजगृहातून वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असून, वारणा धारणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वारणा डावा व उजवा कालवा तसेच वाकुर्डे योजना व वारणा नदीत पाणी सोडले जाईल.

शिराळा मंडल निहाय पाऊस

  • कोकरूड - ७.८ (१५९३.८०)
  • शिराळा - १०.३० (१२५७.६०)
  • शिरशी - २८ (१३०८.२०)
  • मांगले - २९.५० (१४४९.००)
  • सागाव- ३.३० (१४५३.९०)
  • चरण - ८.०० (२८७५.१०)

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिमीमध्ये

  • पाथरपुंज येथे - १२ (७६५३)
  • निवळे - ३ (६२४१)
  • धनगरवाडा - ४ (३७६९)
  • चांदोली धरण - ४ (३७४१)

शिराळा, वाळवा व शाहुवाडी तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे लोकांचे लक्ष लागून राहिलेले असते. यावर्षीही धरण शंभर टक्के भरल्यामुळे नागरिकांची शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. त्यामुळे पाण्याचे काटकोरपणे नियोजन करून मागणीनुसार पाणी सोडण्यात येईल. - गोरख पाटील (शाखा अभियंता, वारणा पाटबंधारे, वारणावती)

Web Title: Chandoli Dam 100 percent full; The worry of water was solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.