चांदोली धरण ९६.७१ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:15+5:302021-09-08T04:32:15+5:30

वारणावती : चांदोलीत पावसाची संततधार सुरूच असून, गेल्या २४ तासांत ५२ मिलिमीटर पाऊस झाला. एकूण २५९९ मिलिमीटर पावसाची नोंद ...

Chandoli Dam is 96.71 percent full | चांदोली धरण ९६.७१ टक्के भरले

चांदोली धरण ९६.७१ टक्के भरले

Next

वारणावती : चांदोलीत पावसाची संततधार सुरूच असून, गेल्या २४ तासांत ५२ मिलिमीटर पाऊस झाला. एकूण २५९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून ७८१६ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणातील पाणीसाठा सकाळी आठपर्यंत ३३.२७ टीएमसी झाला आहे. धरण ९६.७१ टक्के भरले आहे.

शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. चांदोली धरण परिसरात २१ जुलै ते २७ जुलै या सात दिवसांत ढगफुटीसदृश अतिवृष्टीत धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढला. मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू केल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. २७ जुलैपर्यंत दोन हजार मिलिमीटर पाऊस झाला. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी झाला. कमी- अधिक प्रमाणात जुलैअखेर संततधार होतीच; पण गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. चार दिवस तर उन्हाळ्यात उन्हाचा चटका जाणवतो तशी परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाने ओढ दिल्याने माळामुरडाची पिके धोक्यात आली होती. पण पुन्हा गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू झाल्याने पिकांना जीवदान मिळाले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. पाणलोट क्षेत्रातून ७८१६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणात मंगळवारी सकाळी आठ वाजता ३३.२७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ९६.७१ टक्के धरण भरले आहे. तब्बल चौदा दिवसांनंतर ५०० क्युसेक विसर्ग दुपारी तीननंतर सुरू केला आहे. पावसाने असाच जोर वाढवला तर केव्हाही धरणातून पुन्हा विसर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

070921\20210721_131809.jpg

चांदोली धरण फोटो गंगाराम पाटील वारणावती

Web Title: Chandoli Dam is 96.71 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.