सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! चांदोली धरण शंभर टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 09:29 PM2023-09-18T21:29:30+5:302023-09-18T21:29:45+5:30

अनिल पाटील सरुड :    कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले व ३४ . ४० टी.एम . सी . पाणीसाठवण ...

Chandoli dam is 100 percent full | सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! चांदोली धरण शंभर टक्के भरले

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! चांदोली धरण शंभर टक्के भरले

googlenewsNext

अनिल पाटील

सरुड :    कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले व ३४ . ४० टी.एम . सी . पाणीसाठवण क्षमता असलेले चांदोली ( वारणा ) धरण  अखेर सोमवारी शंभर टक्के भरले आहे . कमी पर्जन्यमानामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण उशीरा भरले आहे . हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वारणा नदीकाठच्या शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे . 

  गेल्या एक महिन्यापासुन पावसाने हुलकावणी दिल्याने या धरणातील पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता . सोमवारी सकाळपासुन या धरण क्षेत्रात पावसाचा जोर होता . सोमवारी सायंकाळी ४ वा . पर्यंत धरण क्षेत्रात १४ मि. मी . पावसाची नोंद झाली आहे . आजअखेर धरण क्षेत्रात १६३४ मि. मी . एवढा पाऊस झाला आहे . सध्या धरणात ११०२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे .

धरणात पाण्याची आवक वाढल्याने  या धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊन सोमवारी सायंकाळी हे धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे . धरण क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने धरणाच्या वीज निर्मिती गृहातुन ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरु  करण्यात आला असल्याची माहीती वारणा पाटबंधारे विभागाच्यावतीने देण्यात आली आहे .

Web Title: Chandoli dam is 100 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.