पर्यटकांनो, ३१ डिसेंबर आला; चांदोली मात्र तीन दिवस बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 01:46 PM2022-12-27T13:46:42+5:302022-12-27T14:22:58+5:30

दोन जानेवारीपासून पुन्हा नेहमीप्रमाणेच पर्यटन सुरूच राहणार

Chandoli National Park and Dam closed for tourism for three days | पर्यटकांनो, ३१ डिसेंबर आला; चांदोली मात्र तीन दिवस बंद

पर्यटकांनो, ३१ डिसेंबर आला; चांदोली मात्र तीन दिवस बंद

Next

वारणावती : चांदोली राष्ट्रीय उद्यान व धरण दि. ३० डिसेंबर दि. ते १ जानेवारी अखेर ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस पर्यटनासाठी बंद असणार आहे, अशी माहिती चांदोली अभयारण्याचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे व धरण प्रशासनाचे शाखा अभियंता गोरख पाटील यानी दिली.

शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण व चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटन सुरू आहे. पण सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करताना अभयारण्य व धरण परिसरात काही हौसी, नवसे पार्ट्या करतात, दंगामस्ती करतात.

याचा व अन्य पर्यटकांकडून होणारा उपद्रव लक्षात घेऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान व धरण पाहण्यासाठी दि. ३० डिसेंबर ते दि. १ जानेवारीअखेर तीन दिवस बंदी घालण्यात आली आहे. या तीन दिवसांच्या पर्यटन बंदीनंतर दोन जानेवारीपासून पुन्हा नेहमीप्रमाणेच पर्यटन सुरूच राहणार आहे.
 

Web Title: Chandoli National Park and Dam closed for tourism for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.