चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान पुन्हा उभारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:40+5:302021-07-10T04:18:40+5:30
फोटो ओळ : वादळी वारा व पावसामुळे कोसळलेली चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान पुन्हा उभी केली आहे. लोकमत न्यूज ...
फोटो ओळ : वादळी वारा व पावसामुळे कोसळलेली चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान पुन्हा उभी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : चांदोलीच्या वैभवात भर टाकणारी व पर्यटकांना आकर्षित करणारी चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान वादळी वाऱ्यामुळे मे महिन्यात कोसळली होती. पण आता पुन्हा कमान उभी केल्याने कमानीला गतवैभव प्राप्त झाले आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाची जाधववाडी येथील स्वागत कमान दोन वर्षांपूर्वी उभी करण्यात आली होती. त्याच कमानीवर विविध वन्यप्राण्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. पण त्याचे ओझे कमानीला पेलत नव्हते. शिवाय निकृष्ठ बांधकामामुळे वादळी वाऱ्यात कमानीचा टिकाव लागला नाही. मुसळधार पाऊस, जोरदार वादळी वारे यामुळे ही कमान मे महिन्यामध्ये कोसळली होती. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या व कमानीवर साकारण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींचेही वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले होते. आता ही स्वागत कमान पुन्हा उभी करण्यात आल्यामुळे गतवैभव प्राप्त झाले आहे.