चांदोली राष्ट्रीय उद्यानात सुविधा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:28 AM2021-03-23T04:28:16+5:302021-03-23T04:28:16+5:30

शिराळा : खऱ्या निसर्गाचा आस्वाद घेण्याकरिता पर्यटकांनी अभयारण्याकडे यावे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात लवकरच पर्यटकांसाठी ...

Chandoli will provide facilities in the national park | चांदोली राष्ट्रीय उद्यानात सुविधा देणार

चांदोली राष्ट्रीय उद्यानात सुविधा देणार

Next

शिराळा : खऱ्या निसर्गाचा आस्वाद घेण्याकरिता पर्यटकांनी अभयारण्याकडे यावे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात लवकरच पर्यटकांसाठी उर्वरित सोयी सुविधा उपलब्ध करू, असे मत मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांनी व्यक्त केले.

जागतिक वन दिनानिमित्त चांदोली (ता. शिराळा) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प महासंचालक समाधान चव्हाण, डी.आय.जी. दत्तात्रय कराळे, मुख्य वन अधिकारी उत्तम सावंत, महादेव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्लेमेंट बेन म्हणाले, आपल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार करून पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्याकरता पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा पुरविणार आहे. कर्मचारी अधिकारी यांनी याकरिता सहकार्य करावे.

समाधान चव्हाण म्हणाले, वनविभागाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी पर्यटकांना जाता येईल त्या ठिकाणी पर्यटक जावेत आणि येथील निसर्गाचा आनंद त्यांना घेता यावा याकरिता प्रयत्न करणार आहे. पर्यटकांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहून जंगल वाचविणे आणि वाढविणे याकरिता सहकार्य करावे.

यावेळी कोयना वनक्षेत्रपाल अमित भोसले, बामनोली वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस, गोविंद लंगुटे, निसर्गप्रेमी रोहन भाटे, हेमंत केंजळे, अजितकुमार पाटील, इंद्रजित सुतार, जयसिंग महाडिक उपस्थित होते. वनपाल डी. के. यमगर यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.

Web Title: Chandoli will provide facilities in the national park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.