चांदोली वसाहतीत नियमित पाणी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:57+5:302021-01-23T04:27:57+5:30
आष्टा : आष्टा नगरीचे शिल्पकार विलासराव शिंदे यांच्या प्रयत्नातून शहरात विकासकामे प्रभावीपणे राबविण्यात आली. चांदोली वसाहत येथील नागरिकांना नियमितपणे ...
आष्टा : आष्टा नगरीचे शिल्पकार विलासराव शिंदे यांच्या प्रयत्नातून शहरात विकासकामे प्रभावीपणे राबविण्यात आली. चांदोली वसाहत येथील नागरिकांना नियमितपणे पाणी देण्यात येईल. विकासाच्या सर्व योजना राबविण्यात येतील, अशी ग्वाही आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी दिली.
येथील लोटीव सावंत वस्ती चांदोली वसाहत येथे आष्टा नगरपालिकेचे गटनेते विशाल शिंदे यांच्या प्रयत्नातून ५० नळ कनेक्शन देण्यात आले. या नळजोड कामाचे उद्घाटन वैभव शिंदे व विशाल शिंदे यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते.
या वेळी झुंझारराव पाटील, तेजश्री बोंडे, धैर्यशील शिंदे, सतीश माळी, अंकुश मदने, बाळासाहेब पाटील, अनिल बोंडे, भिवाजी सावंत, शंकर सावंत, तानाजी सावंत, वंदना पाटील, कविता सावंत उपस्थित होते.
फोटो-२२आष्टा२
फोटो : आष्टा येथील चांदोली वसाहतमधील नळ कनेक्शन कामाच्या उद्घाटन प्रसंगी विशाल शिंदे, वैभव शिंदे, झुंजारराव पाटील, धैर्यशील शिंदे, तेजश्री बोंडे, सतीश माळी उपस्थित होते.