मिरजेच्या उपायुक्तपदी चंद्रकांत आडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:22+5:302021-07-14T04:32:22+5:30
ओळी : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाच्या उपायुक्तपदी चंद्रकांत आडके यांची नियुक्ती झाली. त्यांचा सत्कार स्थायी सभापती पांडुरंग कोरे, भाजपचे ...
ओळी : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाच्या उपायुक्तपदी चंद्रकांत आडके यांची नियुक्ती झाली. त्यांचा सत्कार स्थायी सभापती पांडुरंग कोरे, भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक संतोष पाटील, फिरोज पठाण, अमर निंबाळकर, विशाल कलकुटगी यांच्याहस्ते करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मिरजेच्या उपायुक्तपदी चंद्रकांत आडके यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली. आयुक्त नितीन कापडणीस यांनी नियुक्तीचे आदेश दिले. स्मृती पाटील यांना कार्यमुक्त केल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यांच्या जागी प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे.
चंद्रकांत आडके हे सध्या महापालिकेचे प्रभारी नगरसचिव आहेत. ते गेली ३५ वर्षे सेवेत आहेत. त्यांनी आस्थापना अधिकारी, करनिर्धारक व संकलक, कामगार अधिकारी या पदावरही काम केले आहे. करनिर्धारक पदाच्या कार्यकाळात महापालिकेच्या करवसुलीत मोठी वाढ झाली होती तसेच कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्न, महापालिकेची नियमावली यासाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. मिरजेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर त्यांना महापालिकेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. या रिक्त जागी आडके यांच्या नियुक्तीचे आदेश आयुक्तांनी दिले.
आडके यांनी उपायुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्याकडे नगरसचिवपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे. मिरजेतील समस्या सोडविण्यासह शहराच्या विकासावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सत्कार केला.