चंद्रकांतदादा हे आयत्या बिळातील नागोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:27 AM2021-02-16T04:27:38+5:302021-02-16T04:27:38+5:30
ते म्हणाले, पुण्यातील चांगले काम करणाऱ्या एका महिलेने कोथरूड मतदारसंघ मजबूत केला होता. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी विकासकामांच्या ...
ते म्हणाले, पुण्यातील चांगले काम करणाऱ्या एका महिलेने कोथरूड मतदारसंघ मजबूत केला होता. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी विकासकामांच्या जोरावर मतदारसंघावर जोरदार पकड निर्माण केली. पुन्हा भाजपचीच सत्ता येणार, असे सांगणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना स्वतःचा कोल्हापूर जिल्हा सोडून पुण्यातील मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली. ज्यांनी मतदारसंघात पकड निर्माण केली, त्या मेधा कुलकर्णी यांना बाजूला ढकलून चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना मतदारसंघ न मिळणे, यावरून त्यांची जिल्ह्यातील ताकद काय आहे, ते दिसून येते.
चौकट
भाजप नेत्यांचे संतुलन बिघडले
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बोलण्यातून भाजप किती खालच्या स्तरावर गेलेला आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला समजले आहे. महाराष्ट्रातील भाजपची सत्ता गेल्यामुळे वरिष्ठ नेते हतबल झाले असून त्यांचे मानसिक संतुलनही बिघडले आहे. म्हणूनच ते खालच्या स्तरावर जाऊन विरोधकांवर टीका करीत आहेत. प्रसिद्धीच्या मोहापायी शरद पवार यांच्यावर पडळकरांनी टीका केली आहे. चुकीचे बोलणाऱ्यांचे समर्थन करणे योग्य नाही. त्यामुळे शरद पवारांवरील टीका थांबवावी, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
चौकट
मंत्री दोषी असतील तरच कारवाई
पुणे येथे घडलेल्या पूजा चव्हाण या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीमधील मंत्र्यांच्या मागील दोन घटनांमध्ये काहीही तथ्य नव्हते. मंत्री राठोड यांचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध आहे का, हे तपासले पाहिजे. मात्र दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.