रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, मिरज-कोल्हापूर रेल्वेगाड्यांच्या वेळेत येत्या गुरुवारपासून बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 02:06 PM2022-08-22T14:06:20+5:302022-08-22T14:07:00+5:30

मिरज : गुरुवार २५ ऑगस्टपासून काही रेल्वे गाड्यांच्या येण्याजाण्याच्या वेळेत किरकोळ बदल झाला आहे. बदललेल्या गाड्यांच्या वेळा पुढीलप्रमाणे- मिरज ...

change in timings of Miraj Kolhapur trains from Thursday | रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, मिरज-कोल्हापूर रेल्वेगाड्यांच्या वेळेत येत्या गुरुवारपासून बदल

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, मिरज-कोल्हापूर रेल्वेगाड्यांच्या वेळेत येत्या गुरुवारपासून बदल

Next

मिरज : गुरुवार २५ ऑगस्टपासून काही रेल्वे गाड्यांच्या येण्याजाण्याच्या वेळेत किरकोळ बदल झाला आहे. बदललेल्या गाड्यांच्या वेळा पुढीलप्रमाणे- मिरज - कोल्हापूर डेमू मिरजहून दुपारी २.१५ ऐवजी २.३५ वाजता सुटेल व दुपारी ३.३० ऐवजी ३.४५ वाजता कोल्हापूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१५४७ मिरज कोल्हापूर डेमू मिरजेतून सायंकाळी ५.०० ऐवजी ५.०५ वाजता सुटेल व सायंकाळी ६.१० ऐवजी ६.१५ वाजता कोल्हापूरला पोहोचेल. गाड़ी क्रमांक ०१५४२ कोल्हापूर सातारा डेमू कोल्हापूरहून ४.५५ ऐवजी ५.०० वाजता सुटेल. क्रमांक ११०२९ मुंबई - कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस कोल्हापुरात रात्री ८.०० ऐवजी ८.०५ वाजता पोहोचेल. क्रमांक ११४०३ - शनिवार, २७ ऑगस्टपासून सुटणारी नागपूर कोल्हापूर एक्स्प्रेस दुपारी १२.५५ ऐवजी १२.१० वाजता मिरजेत व १.३० वाजता कोल्हापूरला पोहोचणार आहे.

गाडी क्रमांक ११०४६ सोमवार, २९ ऑगस्टपासून सुटणारी धनबाद - कोल्हापूर एक्स्प्रेस दुपारी १२.४० ऐवजी १२.४५ वाजता कोल्हापूरला पोहोचेल. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेकडुन करण्यात आले केले आहे.

Web Title: change in timings of Miraj Kolhapur trains from Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.