बोरगावच्या महावितरण कार्यालयात अनागोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:26 AM2021-05-24T04:26:47+5:302021-05-24T04:26:47+5:30
बोरगाव हे तालुक्यातील लोकसंख्येने मोठे गाव आहे. बोरगाव वीज उपकेंद्रांतर्गत बोरगाव, फार्णेवाडी, शिवाजीनगर, खुंदलापूर हा भाग येतो. येथील ...
बोरगाव हे तालुक्यातील लोकसंख्येने मोठे गाव आहे. बोरगाव वीज उपकेंद्रांतर्गत बोरगाव, फार्णेवाडी, शिवाजीनगर, खुंदलापूर हा भाग येतो. येथील उपअभियंत्यांची सहा महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. तेथे महिला उपअभियंत्यांची नेमणूक केली आहे. या महिला अधिकाऱ्यांना अनुभव कमी आहे. येणाऱ्या तक्रारींमुळे त्यांचा मोबाईल कर्मचाऱ्याकडे दिला असून, तोच अधिकारी बनला आहे. त्याने एक महिना फोन वापरला व गावातील जास्त तक्रारी येतात म्हणून तो बंद ठेवला. तो फोन आजअखेर बंदच आहे. कार्यालयातील समीर मुल्ला हे सहायक उपअभियंता आपल्याकडे कार्यभार असल्याचे सांगतात. त्यामुळे तक्रार नक्की कोणाकडे करायची हाच प्रश्न आहे. महावितरण कंपनीने दिलेले सर्व अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मोबाईल बंद आहेत. काही कर्मचारी नेटवर्क नसल्याचे सांगून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत.
कोट -
बोरगावातील प्रकार चुकीचा आहे. यामुळे ग्राहकांना व नागरिकांना त्रास होतो. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल नेहमी सुरू हवेत. या प्रकाराची चौकशी करून कारवाई करू.
- राजेंद्र सूर्यवंशी, उपकार्यकारी अभियंता, इस्लामपूर.