कडेगावात अधिकाऱ्यांच्या अनागोंदीचे वाभाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:37 PM2019-06-06T23:37:12+5:302019-06-06T23:39:03+5:30
कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी ताकारी, टेंभू योजनेकडील व महावितरणच्या अधिकाºयांच्या अनागोंदी कारभाराचे गुरुवारी अक्षरश: वाभाडे काढले. पाण्याचे चुकीचे नियोजन व अधिकाºयांच्या ढिसाळ कारभारामुळेच पिके वाळू लागल्याचा आरोपही शेतकºयांनी केला. या भावना जाणून घेतल्यानंतर आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी ताकारी, टेंभू योजनेकडील व महावितरणच्या अधिकाºयांच्या अनागोंदी कारभाराचे गुरुवारी अक्षरश: वाभाडे काढले. पाण्याचे चुकीचे नियोजन व अधिकाºयांच्या ढिसाळ कारभारामुळेच पिके वाळू लागल्याचा आरोपही शेतकºयांनी केला. या भावना जाणून घेतल्यानंतर आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी अधिकाºयांना चांगलेच सुनावले. नोटिसा तात्काळ मागे घ्या आणि मागेल तेथे त्वरित टँकर सुरू करा, अशी सूचना त्यांनी दिली.
येथे तहसील कार्यालयात जनतेच्या प्रश्नांवर तात्काळ मार्ग काढण्यासाठी गुरुवारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आ. मोहनराव कदम, शांताराम कदम, प्रांताधिकारी मारुती बोरकर, तहसीलदार अर्चना शेटे, कडेगावच्या नगराध्यक्षा आकांक्षा जाधव, ताकारी योजनेचे प्रकाश पाटील, टेंभू योजनेकडील नरेंद्र घार्गे, मुख्याधिकारी चरण कोल्हे आदी प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीमध्ये कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी ताकारी, टेंभू योजना व महावितरणच्या अनागोंदी कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले. पाण्याचे चुकीचे नियोजन व अधिकाºयांच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकºयांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. बोंबाळेवाडी परिसरात गेल्या दहा वर्षांपासून टेंभू योजनेच्या पाण्याचे कसलेही नियोजन नाही. सुर्ली व कामथी कालव्यांना एकाचवेळी पाणी सोडल्यामुळे गैरसोय होते. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनी अधिकाºयांना फैलावर घेतले. यावेळी विश्वजित कदम यांनी, तात्काळ लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.
टेंभू योजनेच्या अस्तरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असून त्याबाबत तक्रार करताच त्याची चौकशी करण्याचे आदेश कदम यांनी अधिकाºयांना दिले. बोंबाळेवाडी तलावातून रायगाव येथे केवळ ५०० मीटर उचलल्यास रायगाव, बोंबाळेवाडी व शाळगावची सुमारे एक हजार २५० हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. पण, यासाठी अधिकाºयांकडून काहीच प्रयत्न होत नाहीत. यावेळी कदम यांनी, खेराडे-विटा येथे टँकर सुरू करण्याबाबत तात्काळ निर्णय घ्या, दुष्काळी परिस्थितीत पाटबंधारे विभागाने शेतकºयांना काढलेल्या नोटिसा तात्काळ मागे घ्या, बंद झालेली ताकारी योजना तात्काळ सुरू करा, अशा सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.
ताकारी व टेंभू योजनेची पाणीपट्टी योग्य प्रमाणात आकारली जात नसून, ऊस पिकाव्यतिरिक्त अन्य पिकांच्या पाणीपट्टी कपातीचे कोणतेही नियोजन नाही. पाणी आवर्तनाचे योग्य नियोजन नसल्याने कोणालाही व्यवस्थित पाणी मिळत नसल्याची तक्रार यावेळी शेतकºयांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून तडसर या गावाचा पाणीप्रश्न अनुत्तरीत आहे, महावितरणकडून नवीन वीज जोडणी जाणीवपूर्वक रोखली जात आहे, गेल्या अनेक वर्षांपासून गावातील पथदिव्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, गावात वायरमन नाहीत, अशा अनेक तक्रारी यावेळी लोकांनी उपस्थित केल्या.
यावर विश्वजित कदम यांनी अधिकाºयांना, अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. अधिकाºयांनीसुद्धा यातील जास्तीत जास्त प्रश्न येत्या काही दिवसात निकालात काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष इंद्रजित साळुंखे, विठ्ठल मुळीक, वैभव पवार, रायगावचे सरपंच समाधान घाडगे, बंडा पवार, सुरेश मुळीक, कडेगावचे माजी सरपंच विजय शिंदे, वांगीचे सरपंच डॉ. विजय होनमाने, उपसरपंच बाबासाहेब सूर्यवंशी, देवराष्ट्रेचे सरपंच प्रकाश मोरे, नगरसेवक सागर सूर्यवंशी, अमरापूरचे सरपंच सुनील पाटील, मालन मोहिते, परशुराम माळी आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सोनहिरा’मार्फत ढाणेवाडीत चारा छावणी
ढाणेवाडी (ता. कडेगाव) येथे दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनाच्या चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या ठिकाणी सोनहिरा कारखान्यामार्फत चारा छावणी सुरू करणार आहे, अशी घोषणा आ. डॉ. कदम यांनी केली.
कडेगाव येथे गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत आ. डॉ. विश्वजित कदम बोलत होते. यावेळी आ. मोहनराव कदम, मालनताई मोहिते उपस्थित होते.