पतीवरील बलात्काराचा आरोप खोटा,पोलीस पत्नीचा दावा, केला आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 07:52 PM2018-02-24T19:52:25+5:302018-02-24T19:52:25+5:30
सांगली : बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या निलंबित पोलीस कर्मचारी व इतर तरुणांच्या कुटुंबियांनी शहर पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
सांगली : बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या निलंबित पोलीस कर्मचारी व इतर तरुणांच्या कुटुंबियांनी शहर पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत सांगली शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत ३ महिलांनी रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
शहर पोलीस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्यातील एक निलंबित पोलीस कर्मचा?यासह ८ जणांवर एका मुलीने बलात्कार केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार नोंदविली. मात्र हा गुन्हा खोटा असल्याचा आरोप करत गुन्हे दाखल झालेल्यांच्या कुटुंबियांनी आज शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. ज्या मुलीने बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली ती मानसिक रोगी आहे. तिची आधी तपासणी करावी व मगच गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर मोर्चात सहभागी झालेले पोलीस कर्मचारी व अन्य कुटुंबातील तिघा महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाºया महिलांना ताब्यात घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न रोखण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे शहर पोलीस ठाण्यासमोर मोठा गोंधळ निर्माण झाला होता.