कास पठारावर शंभर रुपये शुल्क वसुलीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:01 AM2017-09-02T00:01:07+5:302017-09-02T00:04:10+5:30

पेट्री : जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या व पुष्प पठार म्हणून संबोधल्या जाणाºया कास पठारावर शुक्रवारपासून शुल्क आकारणीस प्रारंभ करण्यात आला.

Charges of Rs | कास पठारावर शंभर रुपये शुल्क वसुलीस प्रारंभ

कास पठारावर शंभर रुपये शुल्क वसुलीस प्रारंभ

Next
ठळक मुद्देसुरक्षा रक्षकांची नेमणूक सलग सुट्या असल्याने पर्यटकांची होणार गर्दी ;स्वागतासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
पेट्री : जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या व पुष्प पठार म्हणून संबोधल्या जाणाºया कास पठारावर शुक्रवारपासून शुल्क आकारणीस प्रारंभ करण्यात आला. मानसी शंभर रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील (कोल्हापूर), उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, वनपाल श्रीरंग शिंदे, वनरक्षक संतोष शिंदे, कास पठार कार्यकारिणी समिती अध्यक्ष विमल शिंगरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आखाडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. कार्यकारिणी समितीचे सदस्य सोमनाथ जाधव यांनी सूत्रसंचालन केले. वनपाल श्रीरंग शिंदे यांनी आभार केले.

फुलांच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने काही दिवसांतच कास पठार फुलांनी बहरणार आहे. पर्यटकांना सुरक्षितता व सुखसुविधा देण्यासाठी वनविभाग व कार्यकारिणी समितीकडून सुरक्षा रक्षक व गाईडची नेमणूक करण्यात आली आहे.
सध्या पठारावर सीतेची आसवे, रानमहुरी, टूथब्रश, दीपकांडी, चवर, पंद, कापरू, अभाळी, तेरडा या फुलांना बहर आला असून, ही फुले पर्यटकांना आकर्षित करू लागली आहे. पावसानेही उघडीप दिल्याने फुले लवकरच उमलू शकतील.


पर्यटकांसाठी निवारा शेड
फुलांच्या हंगामात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी व सुखसुविधा पुरविण्यासाठी वनविभाग व कार्यकारिणी समितीचे कर्मचारी सज्ज झाले आहेत. पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
तसेच वयस्कर, लहान मुले, आजारी व्यक्तींना अचानक कोसळणारा पाऊस, वेगाने वाहणारा वारा, ऊन आदींपासून संरक्षण व्हावे, म्हणून निवारा शेड उभारण्यात आले आहेत.

स्वतंत्र बसची व्यवस्था
घाटाई फाटा, पारंबे फाटा, कास पठाराच्या खालील बाजूस तलावाकडील पार्किंगच्या ठिकाणाहून पर्यटकांना पठारावर ने-आण करण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसचा स्वतंत्र दर आहे. फुलांसाठी वातावरण पोषक असून, वातावरण असेच राहिल्यास आठ ते दहा दिवसांत फुलांना चांगला बहर येईल, अशी माहिती वनपाल श्रीरंग शिंदे यांनी दिली.

Web Title: Charges of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.