इंग्रजी साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक चारुदत्त भागवत यांचे मुंबईत निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 04:02 PM2019-01-05T16:02:42+5:302019-01-05T16:05:03+5:30
इंग्रजी साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक कवी व समीक्षक प्रा. चारुदत्त अच्युत भागवत (वय ६८) यांचे शनिवारी पहाटे मुंबई येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते न्यूमोनियाने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
सांगली : इंग्रजी साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक कवी व समीक्षक प्रा. चारुदत्त अच्युत भागवत (वय ६८) यांचे शनिवारी पहाटे मुंबई येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते न्यूमोनियाने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
इंग्रजी भाषा आणि साहित्याचे अभ्यासक म्हणून प्रा. भागवत यांची ओळख होती. आठ वषार्पुर्वी त्यांना दुर्मिळ आणि दुर्धर अशा जीबी सिड्रोंम या आजाराने ग्रासले होते. या आजाराशी त्यांनी यशस्वी झुंज दिली होती. त्यांच्या या झुंजीवर त्यांच्या पत्नी कल्पना यांनी त्यांच्या सिंड्रोमची कथा' हे पुस्तकही लिहिले होते.
पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात काही वर्षे अध्यापन केल्यानंतर ते सांगलीत आले. मिरजेतील कन्या महाविद्यालयात त्यांनी काही वर्षे अध्यापनाचे काम केले. त्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. प्रा. भागवत यांनी आपल्या कार्यकालात सुटा संघटनेत सक्रीय सहभाग घेतला आणि अन्यायग्रस्त प्राध्यापकांसाठी पदरमोड करून यशस्वी लढे दिले. त्यांचा ह्यवाटेवरील गावह्ण हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे.
दलित साहित्यक अर्जुन डांगळे यांनी पॉयझन्ड ब्रेड' या इंग्रजीत संपादित केलेल्या काव्यसंग्रहातील अनेक कवींच्या कवितांचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला होता. अभ्यासक कवी व समीक्षक प्रा. चारुदत्त भागवत यांचे आज पहाटे मुंबई येथे निधन झाले.