कंत्राटदारधार्जिण्या अभियंत्याची चाैकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:27 AM2021-07-31T04:27:18+5:302021-07-31T04:27:18+5:30
याबाबत महादेव पाटील म्हणाले, सध्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जुन्या येळावी रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे आहे, ...
याबाबत महादेव पाटील म्हणाले, सध्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जुन्या येळावी रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी व तासगाव शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद शेळके यांनी केली होती. संबंधित ठिकाणाची पाहणी केली असता मुरुमाऐवजी चक्क मातीचा वापर केल्याचे दिसून आले.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली असता अभियंता व्ही. व्ही. मोहिते यांनी तक्रार करणाऱ्या नागरिकांशी उर्मट भाषेत बोलून असभ्य वर्तन केले. त्यांचे वर्तन हे पूर्णपणे ठेकेदाराला पाठीशी घालणारे होते. या ठिकाणी टाकलेल्या मातीला मुरुम म्हणण्यापर्यंत अधिकाऱ्याची मजल गेली. यापूर्वीही सांगली रस्ता तसेच ढवळी रस्त्याच्या कामाबाबत झालेल्या तक्रारींनाही केराची टोपली याच अधिकाऱ्याने दाखविली हाेती. यामुळे येळावी रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी. माेहिते यांच्या तासगाव येथील कार्यकाळातील सर्वच चौकशी व्हावी.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे, तासगाव शहर युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष विकास जाधव, महेश पाटील, सुमित पाटील, अक्षय गायकवाड, शिवाजी गुळवे, प्रवीण सरगर, ऋषिकेश पाटील, गोपाळ शिंदे, विशाल हिंगमिरे, सुशांत धनवडे उपस्थित होते.