नळ जोडणीची तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:20 AM2021-06-01T04:20:22+5:302021-06-01T04:20:22+5:30

कुशल मजुरांचा तुटवडा सांगली : शहरामध्ये विविध कुशल कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. मात्र कुशल मजुरांची ...

Check the plumbing connection | नळ जोडणीची तपासणी करा

नळ जोडणीची तपासणी करा

googlenewsNext

कुशल मजुरांचा तुटवडा

सांगली : शहरामध्ये विविध कुशल कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. मात्र कुशल मजुरांची कमतरता आहे. अनेक गावांमध्ये दरवर्षी कुशल कामगारांचा तुटवडा जाणवतो.

शाळा आवारात जनावरे

सांगली : शहरातील काही महपालिका शाळांमधील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षण भिंत उभारण्यात आली नाही. तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारण्यात आले नाही. परिणामी गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात बसत आहेत.

खुल्या जागांमुळे दुर्गंधी

सांगली : महापालिका प्रशासनाच्यावतीने लाखो रुपये खर्च करून वाॅर्डा-वाॅर्डात खुले भूखंड तयार करून संरक्षण भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट लावले; मात्र या खुल्या भूखंडावर नियंत्रण न ठेवल्याने तेथे कचरा टाकला जात आहे.

विद्युत तारांवरील फांद्यांची कटाई करा

सांगली : रस्त्याच्या बाजूने विजेचे खांब आहेत. रस्त्याच्या बाजूला झाडेसुद्धा आहेत. झाडाच्या फांद्या विद्युत तारांवर आल्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचा धोका असतो. त्याचबरोेबर एखादी दुर्घटनासुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्युत तारांवरील फांद्या तोडण्याची मागणी आहे.

वयोवृद्धांना ३ हजार रुपये पेन्शन द्या

सांगली : जिल्ह्यात वयोवृद्ध ओबीसी शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी असून, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षांनंतर प्रती महिना तीन हजार रुपये वृद्धापकालीन अर्थसहाय्य पेन्शन योजना लागू करण्यात यावी.

चतुर्थ श्रेणी दर्जापासून कोतवाल वंचित

सांगली : गावात दवंडी देणे, मृतदेहाची विल्हेवाट लावणे, शेतसारा जमा करणे, अशी विविध कामे करणाऱ्या जिल्हाभरातील सजाअंतर्गत कोतवालांना महिन्याकाठी अल्प मानधन दिले जात आहे. वारंवार मागणी करूनही कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांना हस्तलिखित सात-बारा पुरवा

लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

सांगली : कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयाच्या वेळेवर येणे गरजेचे असतानाही बहुतांश कर्मचारी ११ वाजल्याशिवाय येतच नाही. त्यामुळे कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिक येऊन अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत असतात. तालुक्याच्या अतिदुर्गम व ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना कामाशिवाय परतावे लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंडसुद्धा साेसावा लागताे.

सौरदिवे नादुरुस्त

सांगली : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सौरदिवे लावण्यात आले आहेत. परंतु अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे बेकामी झाले आहेत.

पशुखाद्यांच्या किमतीत भरमसाट वाढ

सांगली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या.

Web Title: Check the plumbing connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.