सागाव-सरूड रस्त्यावर चेकपोस्ट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:24 AM2021-04-26T04:24:23+5:302021-04-26T04:24:23+5:30
पुनवत : शिराळा तालुक्यातील सागाव ते सरूड रस्त्यावर वारणा नदीवरील पुलाजवळ शिराळा व शाहूवाडी पोलिसांच्या वतीने चेकपोस्ट सुरू करण्यात ...
पुनवत : शिराळा तालुक्यातील सागाव ते सरूड रस्त्यावर वारणा नदीवरील पुलाजवळ शिराळा व शाहूवाडी पोलिसांच्या वतीने चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहे.
सागाव ते सरूड हा रस्ता सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या पाहता जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी चेकपोस्ट उभा केले आहेत. परजिल्ह्यातून इतर जिल्ह्यात येणाऱ्या लोकांची वर्दळ यामुळे थांबली आहे. सरुड-सागावदरम्यान वारणा नदीवर असणारा हा पूल कोल्हापूर - सांगली जिल्हा जोडतो. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. सागाव व परिसरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शिराळा पोलिसांनी सांगली जिल्हा हद्दीत, तर शाहूवाडी पोलिसांनी कोल्हापूर जिल्हा हद्दीत पुलानजीक चेक पोस्ट उभा केले आहेत. शिराळा पोलीस येथे कर्तव्य बजावत आहेत. अत्यावश्यक सेवा, नोकरदार वर्ग, तसेच शासकीय कर्मचारी वगळता इतरांना जिल्हा प्रवेशास प्रतिबंध केला जात आहे.
फोटो : २५ पुनवत २
ओळी : शिराळा तालुक्यात सागाव पुलानजीक पाेलिसांनी चेकपाेस्ट सुरू केले आहे.