वाळव्यातील ओढ्यात केमिकलयुक्त पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:06+5:302021-03-09T04:30:06+5:30
वाळवा : येथील हुतात्मा साखर कारखान्याकडील नाल्यातून ओढ्यात केमिकलमिश्रित पाणी रात्रभर सोडण्यात येत असल्याचे दिसून येते आहे. हे पाणी ...
वाळवा : येथील हुतात्मा साखर कारखान्याकडील नाल्यातून ओढ्यात केमिकलमिश्रित पाणी रात्रभर सोडण्यात येत असल्याचे दिसून येते आहे. हे पाणी ओढ्यातून सरळ कृष्णा नदीत मिसळत आहे. त्यामुळे वाळव्याच्या परिसरात कृष्णेला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. पहाटे साडेचारपासून कृष्णा घाटावर आंघोळीस नागरिकांची गर्दी असते.
लोकांना या पाण्याच्या दुर्गंधीयुक्त व रंगाचे पाणी तोंडातसुद्धा घेऊ वाटत नाही. प्रदूषण विभागाने दिवसा व रात्री टेहळणी ठेवून जीवघेण्या व केमिकलयुक्त नदीत मिसळणाऱ्या पाण्याचा तपास करून योग्य ती कारवाई करावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे. आठ दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला हाेता. यानंतर दिवसा पाणी सोडण्याचे बंद झाले व रात्री सुरू झाले. या ओढ्यातून केमिकलयुक्त येणाऱ्या पाण्याचा प्रदूषण विभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.