चेतन पवार आत्महत्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

By admin | Published: October 23, 2016 12:06 AM2016-10-23T00:06:18+5:302016-10-23T00:42:46+5:30

तासगाव बलात्कार प्रकरणाला कलाटणी : संशयितावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाखांची माणगी

Chetan Pawar commits suicide for five people | चेतन पवार आत्महत्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

चेतन पवार आत्महत्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

Next

तासगाव : ‘पाच लाख रुपये दे अन्यथा तुझ्या भावावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करतो, त्याला फासावर लटकवतो’, असा दबाव टाकल्यानेच डान्समास्टर मयूर दत्तात्रय पवार याचा भाऊ चेतन पवार (रा. स्टेट बँकेजवळ, काशिपुरा गल्ली, तासगाव) याने आत्महत्या केल्याचे त्याने लिहिलेल्या चिठ्ठीवरून तपासात पुढे आले आहे.
याप्रकरणी तरुणीसह पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तासगावमधील डान्स शिकवणीतील बलात्कार प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
तरुणी आणि तिच्या आईसह महेश सुधीर बोराडे (सर्व रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), गीता सुदाम कांबळे (रा. कोंडिगीरी, ता. शि
रोळ) व संतोष कोळी (रा. सलगरे, ता. मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मृत चेतनचा मावसभाऊ सचिन संभाजी निंबाळकर (वय २०, रा. सलगरे, ता. मिरज) याने फिर्याद दिली.
याबाबत तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डान्समास्टर मयूर पवार याने डान्स स्पर्धांच्या माध्यमातून इचलकरंजीतील तरुणीशी जवळीक वाढवली. त्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तिला विजेचे झटके देऊन बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी तासगाव पोलिसांत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी मयूरचा भाऊ चेतनने संबंधित तरुणीसह तिच्या नातेवाईक व परिचितांना फिर्याद मागे घेण्याची विनंती केली होती.
‘माझ्या भावाने तुमच्या मुलीला मारले आहे, ही त्याची चूक आहे; मात्र बलात्कार केला नाही. तुम्ही चुकीचा गुन्हा कशाला दाखल करता’, अशी विनवणी तो करत होता. यावेळी तरुणीशी संबंधित असलेल्या गीता कांबळे यांनी ‘तू पाच लाख रुपये दे, नाही तर तुझ्या भावाला फासाला लटकवतो’, अशी धमकी दिली. एवढी मोठी रक्कम लगेच उभी करणे शक्य नसल्याने चेतन अस्वस्थ होता. मित्रांजवळही त्याने त्याचा उल्लेख केला होता.
चेतनच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित तरुणीसह पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे बलात्कार प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)


चिठ्ठीतून झाला उलगडा
चेतनने सलगरे येथील संतोष कोळी याला पानटपरी सुरू करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी साठ हजार रुपये दिले होते. तोही पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. याच मानसिक त्रासातून चेतनने गुरुवारी सायंकाळी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून ही माहिती उघड झाली आहे.

Web Title: Chetan Pawar commits suicide for five people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.