मुख्यमंत्री साधणार सरपंचांशी थेट संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:19 AM2021-06-06T04:19:57+5:302021-06-06T04:19:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : कोरोना योध्दा म्हणून काम करीत गाव कोरोनामुक्त करणाऱ्या सरपंचांशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे संवाद साधणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : कोरोना योध्दा म्हणून काम करीत गाव कोरोनामुक्त करणाऱ्या सरपंचांशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे संवाद साधणार आहेत. त्यासाठी मोहित्यांचे-वडगाव (ता. कडेगाव) येथील सरपंच विजय मोहिते यांना संधी मिळणार आहे.
राज्यातील अनेक गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले आहे. काही गावे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह ग्राम दक्षता समितीच्या प्रयत्नामुळे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी गावाबाहेरच कोरोनाला रोखणाऱ्या तसेच गाव कोरोनामुक्त करणाऱ्या सरपंचांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. दि. ७ व दि. ८ या दोन दिवसांत मुख्यमंत्री ठाकरे ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधणार आहेत.
त्यासाठी मोहित्यांचे-वडगाव येथील सरपंच मोहिते यांना संधी देण्यात आली आहे.
मोहित्यांचे-वडगाव गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सरपंच मोहिते, ग्रामसेवक पी. बी. पाटील, तलाठी सोमेश्वर जायभाय, विकास कुंभार यांच्यासह पोलीस प्रशासन व समितीच्या सदस्यांनी रात्रीचा दिवस केला आहे. उपाययोजना, लसीकरण, आरोग्य सर्व्हे तसेच शासनाकडून मदतीसाठी अजून काही अपेक्षा आहेत का, याबाबत मुख्यमंत्री ठाकरे सरपंचांशी चर्चा करणार आहेत.
फोटो - ०५०६२०२१-विटा-ग्रामपंचायत मोहित्यांचे-वडगाव इमारत.
फोटो - ०५०६२०२१-विटा-विजय मोहिते, सरपंच.