कारभारी जोमात! ‘मुख्यमंत्री स्टाईल’ने सरपंचांचा शपथविधी, सांगलीत जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 05:16 PM2023-01-06T17:16:00+5:302023-01-06T17:51:34+5:30

भाषणात म्हणाले, ‘होय, मला गावचा मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतंय

Chief ministerial style swearing ceremony of Nutan Sarpanch of Vanjarwadi village in Sangli district | कारभारी जोमात! ‘मुख्यमंत्री स्टाईल’ने सरपंचांचा शपथविधी, सांगलीत जोरदार चर्चा

कारभारी जोमात! ‘मुख्यमंत्री स्टाईल’ने सरपंचांचा शपथविधी, सांगलीत जोरदार चर्चा

Next

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव तालुक्यातील वंजारवाडी गावात नूतन सरपंच अरुण खरमाटे यांनी सरपंचपदाचा कार्यभार ‘मुख्यमंत्री स्टाईल’ने स्वीकारला. सरपंच, उपसरपंचासह नऊ सदस्यांनी शपथ घेत पदभार स्वीकारला. खरमाटे यांच्या अनोख्या पद्धतीने पदभार स्वीकारलेल्या सोहळ्याची चर्चा आहे.

सरपंचपदाचे वाढलेले अधिकार पाहून यंदाच्या निवडणुकीत निवडणूक चुरशीची झाली. यात जे  सरपंच झाले, त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना गावचा मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत आहे, त्याचा प्रत्यय गुरुवारी तासगाव तालुक्यातील वंजारवाडीत आला.

सरपंचपदावर विराजमान झालेले अरुण खरमाटे, उपसरपंच बाजीराव खरमाटे यांचा पदग्रहण सोहळा अगदी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी पद्धतीने पार पडला. निवडणूक निर्णय अधिकारी रणधीर पाटील यांच्या उपस्थितीत कर्तव्याची शपथ घेण्यात आली.

गावचा मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटते

सोहळा साध्याच पद्धतीने; पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांच्या शपथविधीसारखा झाला. या सोहळ्यानंतर सरपंच खरमाटे भाषणात म्हणाले, ‘होय, मला गावचा मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे.’ वंजारवाडी गावातील सरपंचांचा शपथविधी सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: Chief ministerial style swearing ceremony of Nutan Sarpanch of Vanjarwadi village in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.