मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मिरजेमध्ये रोखला

By admin | Published: July 5, 2017 11:33 PM2017-07-05T23:33:13+5:302017-07-05T23:33:13+5:30

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मिरजेमध्ये रोखला

Chief Minister's congratulatory resolution prevailed in the mirage | मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मिरजेमध्ये रोखला

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मिरजेमध्ये रोखला

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव भाजपची सत्ता असलेल्या मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी रोखला. जिल्हा परिषदेने खरेदी केलेल्या सौरकंदील व भात मळणी यंत्रांच्या खरेदीत एक कोटीच्या घोटाळ्याची व टाकळी येथील बंधाऱ्याच्या नित्कृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी सदस्यांनी बुधवारी सभेत केली.
पंचायत समितीची मासिक सभा सभापती जनाबाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती काकासाहेब धामणे, गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत पार पडली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव सत्ताधारी गटाचे सदस्य राहुल सकळे यांनी मांडला. यास काँग्रेसचे अशोक मोहिते, अजयसिंह चव्हाण, अनिल आमटवणे, रंगराव जाधव, कृष्णदेव कांबळे यांनी जोरदार विरोध केला. जाचक अटींमुळे कर्जमाफीस बहुसंख्य शेतकरी अपात्र असल्याचे कृष्णदेव कांबळे यांनी निदर्शनास आणले. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या कर्जमाफीऐवजी, निकष न लावता सर्व शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमाफी दिल्यानंतर अभिनंदनाचा ठराव घ्या, असे सांगत हा ठराव राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी रोखून धरला. उपसभापती धामणे यांनी ठरावाचा आग्रह धरला. मात्र विरोधी सदस्यांच्या विरोधामुळे तो बारगळला. बहुमत असतानाही भाजप सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली.
जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केलेल्या एलईडी सौरकंदील व भात मळणी यंत्र खरेदी घोटाळ्याची अशोक मोहिते यांनी तक्रार केली. खरेदीची रक्कम व साहित्य दोन्हीही ठेकेदाराकडे असल्याने, यातही घोटाळा असल्याने संबंधितांची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी मोहिते यांनी केली.
टाकळीतील बंधारा निकृष्ट
मुख्यमंत्र्यांच्या जलशिवार योजनेअंतर्गत टाकळी येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यासाठी मातीमिश्रित वाळू व मातीचा वापर करण्यात आला असल्याने सिमेंट बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ग्रामस्थांनी विरोध करूनही ते पूर्ण करण्यात आले आहे. या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी अनिल आमटवणे यांनी केली. विविध विषयांच्या चर्चेत विक्रम पाटील, छाया हत्तीकर, दिलीपकुमार पाटील, शुभांगी सावंत यांनी सहभाग घेतला.
हिंदू-मुस्लिम निरपराधांवरील खटलेही मागे घ्या
मिरज दंगलप्रकरणी फक्त भाजपचे मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांवरील गुन्हेच मागे घेण्यात आले आहेत. दंगलीत अडकलेल्या सर्व हिंदू-मुस्लिम निरपराध तरूणांवरील गुन्हेही शासनाने मागे घेण्याची मागणी काँग्रेसचे अनिल आमटवणे यांनी केली. दोन्ही गटाच्या तरूणांवरील खटले मागे घेण्यासाठी प्रयत्न केल्यास आ. सुरेश खाडे यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असेही आमटवणे यांनी सांगितले.

Web Title: Chief Minister's congratulatory resolution prevailed in the mirage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.