कोरोना पाठाेपाठ चिकुनगुनिया, डेंग्यूचा डंखही वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:51+5:302021-06-09T04:32:51+5:30

सांगली : कोरोनाचा कहर अनुभवलेल्या जिल्ह्यात सध्या रूग्णसंख्या स्थिर होत जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. त्यातच ...

Chikungunya and dengue stings are also on the rise | कोरोना पाठाेपाठ चिकुनगुनिया, डेंग्यूचा डंखही वाढतोय

कोरोना पाठाेपाठ चिकुनगुनिया, डेंग्यूचा डंखही वाढतोय

Next

सांगली : कोरोनाचा कहर अनुभवलेल्या जिल्ह्यात सध्या रूग्णसंख्या स्थिर होत जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. त्यातच आता पावसाळ्याचे वेध लागल्याने पाणी साचून राहिल्याने होणाऱ्या आजारांचे आव्हान असणार आहे. गेल्या चार वर्षांत चिकुनगुनिया, मलेरियाचे रूग्ण वाढतच असून त्यात डेंग्यूचे वाढते प्रमाण कायम आहे. त्यामुळे आता आपल्या घराभोवती पाणी साचून राहणार नाही व त्यातून डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे.

मान्सूनची चाहूल लागली असून वळीवाच्या पावसाने जिल्हाभर चांगली हजेरीही लावली आहे. या कालावधीत डेंग्यु, चिकुनगुनिया आणि मलेरियाचे प्रमाण वाढत असते. गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून इतर आजारांच्या बाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही २०१९ मध्ये डेंग्यूचे ७३१ रुग्ण आढळून आले होते. त्यात तिघांचा मृत्यू झाला होता तर चिकुनगुनियाचेही २७५ रुग्ण आढळले होते.

हिवताप कार्यालयाकडून डासांची घनता, संशयित रुग्णांचे नमुने तपासणीस घेणे व अभियानातून जनजागृती सुरू असली तरीही मलेरिया, चिकुनगुनियापेक्षा डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे. तीन वर्षात पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण कमी होण्यासह रूग्णसंख्याही घटली असलीतरी पावसाळ्यात योग्य त्या खबरदारी घेतल्या नाही तर पुन्हा डेंग्यूचा डंख नागरिकांना सहन करावाच लागणार आहे.

चौकट

ही घ्या काळजी

* डेंग्यू, चिकुनगुनिया होणाऱ्या एडीसइजिप्ती या डासांची उत्पत्ती घरातच होते. हौद, बॅरेलसह इतर पाणी साठे उघडे ठेवल्यास त्यावर डास अंडी घालतात. त्यामुळे पाणी नेहमी झाकून ठेवावे.

* आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळून घरातील पाणी साठविण्यास वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ, घासून, पुसून ती कोरडी ठेवातीत.

* काही ठिकाणी हौद स्वच्छ करण्यास अडचणी असतील तर त्यात अळीनाशक मिश्रण टाकावे जेणेकरून डासांची उत्पत्ती रोखता येणार आहे.

चौकट

डबक्यांमध्ये गप्पी मासे

१) घरातील भांडी स्वच्छ केली तरीही बाहेरील डबक्यांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेत त्यात गप्पी मासे सोडावेत. ते डासांची अळी खाऊन टाकतात.

२) घरात बऱ्याच दिवसांपासून पडून असलेले भंगार, टायर अशा वस्तूंमध्ये पावसाळ्यात पाणी साचून राहते व त्यातून डास निर्मिती होते त्यामुळे अशा वस्तू टाकून द्याव्यात.

कोट

पावसाळ्यात या आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन प्रशासनाकडून योग्य ते नियोजन करण्यात येते. तरीही नागरिकांनी आपल्या घरात फ्रीज, कुलरसह इतर ठिकाणी पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे डासांची उत्पत्ती होणार नाही.

शुभांगी आधटराव, जिल्हा हिवताप अधिकारी

चौकट

अशी आहे आकडेवारी

डेंग्यू सॅम्पल पॉझिटिव्ह

२०१७ ३३९ ५८

२०१८ ५४६ ७६

२०१९ १७७३ ७३१

२०२० ६३४ ११५

मे २१ ९६ ११

मलेरिया

सॅम्पल पॉझिटिव्ह

२०१७ ४२१८४२ ५२

२०१८ ३९११५०६ ३१

२०१९ ४१८३२२ १६

२०२० २८६४०५ १२

मे २१ ११९२६४ १

चिकुनगुनिया

सॅम्पल पॉझिटिव्ह

२०१७ २१४ ६३

२०१८ २५३ ७३

२०१९ ५०५ २७५

२०२० १९२ १०४

मे २१ २३ ११

Web Title: Chikungunya and dengue stings are also on the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.