मुलगा हवा ही मानसिकता स्त्रियांमध्ये अधिक-- दीपाली काळे :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 09:58 PM2017-09-22T21:58:59+5:302017-09-22T21:59:27+5:30

मालगाव : मुलगी ओझे न मानता, ती दोन्ही घरांचे नाव उज्ज्वल करते, हे स्त्रियांनी सिद्ध केले आहे.

Children in this mentality more in women - Deepali Kale: | मुलगा हवा ही मानसिकता स्त्रियांमध्ये अधिक-- दीपाली काळे :

मुलगा हवा ही मानसिकता स्त्रियांमध्ये अधिक-- दीपाली काळे :

Next
ठळक मुद्देमालगाव येथे मुलीच्या जन्माचे यादव कुटुंबियांकडून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
मालगाव : मुलगी ओझे न मानता, ती दोन्ही घरांचे नाव उज्ज्वल करते, हे स्त्रियांनी सिद्ध केले आहे. हे लक्षात घेऊन स्त्रियांनी मुलीच्या जन्माबाबतची नकारात्मक भूमिका बदलणे गरजेचे आहे, असे मत पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांनी व्यक्त केले.
मालगाव (ता. मिरज) येथे संजय यादव (तिवारे) यांनी मुलगा निखिल यास मुलगी झाल्याचा आनंद संपूर्ण गावात शंभर किलो जिलेबी वाटून साजरा केला. निमित्त जिलेबी वाटपाचे असले तरी, उपअधीक्षक दीपाली काळे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या उपस्थितीत मुलीच्या जन्माचे महत्त्व पटवून देणारे प्रबोधनाचे कार्य यादव कुटुंबाने केले. या कार्यक्रमात काळे बोलत होत्या. यावेळी काळे यांचा विजया यादव, उपसरपंच रूपाली दंडवडे यांनी, तर डॉ. पल्लवी सापळे यांचा पंचायत समिती सदस्या शुभांगी सावंत यांनी सत्कार केला.
काळे म्हणाल्या, वंशाला मुलगा हवा, मुलगी नको, या मानसिकतेतून गर्भातच भ्रूणहत्या करण्याचे प्रकार सुरू आहेत. याला पुरुषापेक्षा मुलगाच हवा ही स्त्रिची मानसिकता अधिक जबाबदार असल्याचे आढळून येते. .
यावेळी मालगाव मठाचे रुद्रमणी गुरू गंगाधर महास्वामी, बांधकाम सभापती अरुण राजमाने, पंचायत समितीचे उपसभापती काकासाहेब धामणे, सरपंच प्रशांत माळी, उपसरपंच रूपाली दंडवडे, प्रदीप सावंत, शशिकांत कनवाडे, सतीश बागणे, राजू भानुसे, अस्लम मुजावर, संजय काटे, विलास होनमोरे, तुषार खांडेकर उपस्थित होते.

मालगाव (ता. मिरज) येथे मुलीच्या जन्माच्या स्वागतानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांचा उपसरपंच रूपाली दंडवडे, विजया यादव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Children in this mentality more in women - Deepali Kale:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.