बदलत्या काळात मुलांना दर्जेदार शिक्षण हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:21 AM2021-01-14T04:21:53+5:302021-01-14T04:21:53+5:30
वारणावती : पालकांनी मुलांना नियमित शाळेत पाठविणे, त्यांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवून अभ्यास करून घेतला पाहिजे. बदलत्या काळानुसार डोंगरकपारीतील ...
वारणावती : पालकांनी मुलांना नियमित शाळेत पाठविणे, त्यांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवून अभ्यास करून घेतला पाहिजे. बदलत्या काळानुसार डोंगरकपारीतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, असे मत शिराळा पंचायत समितीचे उपसभापती व मुख्याध्यापक बाळासाहेब नायकवडी यांनी व्यक्त केले.
हुतात्मानगर सोनवडे येथील हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले की, तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवरील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून शिक्षकाबरोबरच पालकांनी मुलांकडून अभ्यास करून घेतला पाहिजे. तरच मुले प्रगती करतील.
आर. डी. लुगडे म्हणाले की, स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी पालकांनी जागृत राहून मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन द्यावे.
यावेळी आनंदा जाधव, बाबूराव नाईक, गोरख डवरी, नामदेव मिरूखे, शंकर खोत, आर. एम. पाडवी, जी. जी. पाटील, मुकुंद कांबळे, भीमराव पाटील उपस्थित होते. एस. ए. गायकवाड यांनी आभार मानले.
फोटो येणार आहे.
फोटो ओळ : सोनवडे (ता. शिराळा) येथील हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित पालक सभेत उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांनी मार्गदर्शन केले.