जिल्ह्यातील कारखान्याची धुराडी झाली थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:22 AM2021-04-03T04:22:46+5:302021-04-03T04:22:46+5:30

सांगली : जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी ७९ लाख आठ हजार ९०६ टन उसाचे गाळप करून ९३ लाख सात हजार ...

The chimney of the factory in the district became cold | जिल्ह्यातील कारखान्याची धुराडी झाली थंड

जिल्ह्यातील कारखान्याची धुराडी झाली थंड

Next

सांगली : जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी ७९ लाख आठ हजार ९०६ टन उसाचे गाळप करून ९३ लाख सात हजार ३१ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्यांचा साखर उतारा ११.८ टक्के राहिला आहे. १५ साखर कारखान्यांपैकी १३ कारखान्यांची धुराडी बंद झाली असून केवळ सोनहिरा, उदगिरी कारखान्यांचे गळीत हंगाम चार दिवस चालणार आहेत. राजारामबापू कारखान्याच्या कारंदवाडी युनिटने उच्चांकी १२.७० टक्के साखर उतारा तर साखराळे युनिटने उच्चांकी नऊ लाख ४४ हजार ५१५ टन उसाचे गाळप करून ११ लाख २१ हजार १०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाला. पंधरा कारखान्यांचे पाच महिने गळीत हंगाम चालू होते. दत्त इंडिया, राजारामबापूचे चार युनिट, मोहनराव शिंदे, क्रांती, हुतात्मा, विश्वासराव नाईक, यशवंत शुगर, तासगाव, दालमिया, सदगुरू श्रीश्री या कारखान्यांनी ऊस संपल्यामुळे गळीत हंगाम बंद केले आहेत. या कारखान्यांनी ७९ लाख आठ हजार ९०६ टन उसाचे गाळप करून ९३ लाख सात हजार ३१ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ११.०८ टक्के राहिला आहे. यापैकी राजारामबापू कारखान्याच्या कारंदवाडी युनिटने तीन लाख ८३ हजार ६५३ टन उसाचे गाळप करून चार लाख ८८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. १२.७० टक्के साखरेचा उतारा मिळाला आहे. पंधरा कारखान्यांत राजारामबापूच्या कारंदवाडी युनिटचा उच्चांकी साखर उतारा आहे. सोनहिरा कारखान्याने नऊ लाख १२ हजार ६७० टन उसाचे गाळप करून ११ लाख १५ हजार ५७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून साखर उतारा १२.२६ टक्के घेतला आहे. गाळप, साखर उताऱ्यात सोनहिरा कारखान्याने जिल्ह्यात दुसरे स्थान पटकविले आहे. सोनहिरा, उदगिरी कारखान्याचे आणखी चार दिवस गळीत हंगाम चालणार आहेत.

चौकट

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा लेखाजोखा

कारखाने गाळप टन साखर/क्विंटल साखर उतारा

वसंतदादा-दत्त इंडिया ८७७४७० १०३२६८० ११.७७

राजारामबापू पाटील, साखराळे ९४४५१५ ११२११०० ११.८०

विश्वास, चिखली ५८०८४४ ६६०९१० ११.३८

हुतात्मा, वाळवा ५५५५८८ ६४६२२५ १२.०५

राजारामबापू, वाटेगाव ५२३९५७ ६४५७०० १२.३५

तासगाव १४८५७५ १५९००० १०.०७

राजारामबापू, तिपेहरळी १५५०६९ १५२७७० ९.८५

सोनहिरा, वांगी ९१२६७० १११५५७० १२.२६

क्रांती-कुंडल ८६०९६० १०३९६४० १२.०८

राजारामबापू, कारंदवाडी ३८३६५३ ४८८००० १२.७०

मोहनराव शिंदे, आरग २८९५५५ ३३१८२७ ११.४६

निनाईदेवी, दालमिया ३६२६५० ४५१०२५ १२.४४

यशवंत शुगर, नागेवाडी ११९५७५ १२६१७० १०.५०

उदगिरी शुगर, बामणी ५५६१७० ६६२८९० ११.९२

सदगुरू श्री श्री राजेवाडी ६३७६५५ ६८३५२४ १०.७२

एकूण ७९०८९०६ ९३०७०३१ ११.०८

Web Title: The chimney of the factory in the district became cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.