नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:44+5:302021-07-23T04:17:44+5:30
सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. तसेच गुरुवारी रात्री ...
सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. तसेच गुरुवारी रात्री आठपासून वारणा धरणातून २२ हजार क्युसेस पाण्याचा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. अफवांवर विश्वासू ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, शहरात कृष्णा नदीवर असलेल्या आयर्विन पुलाची पाणीपातळी शुक्रवारी सकाळपर्यंत ३५ फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी नागरिकांना स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे. अशा ठिकाणी त्यांना माहिती देऊन प्रशासनातर्फे स्थलांतरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
सध्या होत असलेल्या पावसाचे प्रमाण लक्षात घेता कोयना व वारणा धरणाच्या विसर्गात वाढ होऊन पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.