सांगलीत मराठा क्रांती मोर्चासाठी जिल्हाभरातून नागरिक येण्यास सुरुवात

By शरद जाधव | Published: September 17, 2023 10:37 AM2023-09-17T10:37:07+5:302023-09-17T10:37:15+5:30

विविध राजकीय पक्षांचे नेतेही याठिकाणी दाखल झाले आहेत.

Citizens from all over the district started coming for Maratha Kranti Morcha in Sangli | सांगलीत मराठा क्रांती मोर्चासाठी जिल्हाभरातून नागरिक येण्यास सुरुवात

सांगलीत मराठा क्रांती मोर्चासाठी जिल्हाभरातून नागरिक येण्यास सुरुवात

googlenewsNext

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज सांगलीत मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासून संपूर्ण शहरात मोर्चाचे वातावरण असून आता संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक येण्यास सुरुवात झाली आहे.

शहरातील विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. तिथून हा मोर्चा गेस्ट हाऊस, कर्मवीर चौक ते राम मंदिर चौकात जाणार आहे. त्याठिकाणी काही तरुण मनोगत व्यक्त करणार आहेत. सकाळी नऊ पासूनच मराठा बांधव विश्रामबाग येथे जमण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील विविध भागात पार्किंगची सोय करण्यात आली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेतेही याठिकाणी दाखल झाले आहेत.

Web Title: Citizens from all over the district started coming for Maratha Kranti Morcha in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.