सिटी हायस्कूलच्या १९९६च्या बॅचची कोरोनासाठी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:19 AM2021-06-06T04:19:21+5:302021-06-06T04:19:21+5:30
सांगली : सिटी हायस्कूलमधील दहावीच्या १९९६च्या बॅचने कोरोना रुग्णांसाठी विविध उपकरणे भेट दिली. धनंजय वाघ, प्रसन्न पाटील, मंगेश ...
सांगली : सिटी हायस्कूलमधील दहावीच्या १९९६च्या बॅचने कोरोना रुग्णांसाठी विविध उपकरणे भेट दिली. धनंजय वाघ, प्रसन्न पाटील, मंगेश येडूरकर, आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला.
त्यांनी बॅचमधील देश-विदेशातील सहकाऱ्यांशी संपर्क साधत मदतीचे आवाहन केले. त्यातून मिरज कोविड रुग्णालय व सांगली शासकीय रुग्णालयाला प्रत्येकी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपकरणे दिली. महापालिकेला एक ऑक्सिजन उपकरण दिले. १३० ऑक्सिमीटर्सही वाटले. सिद्धीविनायक, प्रकाशबापू, एमएसआय रक्तपेढ्या, महावीर वाचनालय यांनाही उपचार साहित्य दिले. रुग्ण सहाय्य समितीला ऑक्सिजन सिलिंडर दिले. विविध कंपन्यांशी संपर्क करुन त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून मिरज कोविड रुग्णालयाला २० बेड, पोलीस कोरोना केअर सेंटरला २० बेड, डॉ. पतंगराव कदम कोविड केअर सेंटर, विश्व आरोग्य कोविड केअर सेंटर व नमराह फाऊंडेशन कोविड सेंटरलाही मदत दिली.