बोरगावात उपसरपंच निवडीवेळी हाणामारी; ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:26 AM2021-03-05T04:26:16+5:302021-03-05T04:26:16+5:30

हाणामारीत गणेश पाटील हे आणखी एक सदस्य गंभीर, तर आठ ते दहा कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गुरुवारी ...

Clashes in Borgaon during sub-panch election; Death of Gram Panchayat member | बोरगावात उपसरपंच निवडीवेळी हाणामारी; ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

बोरगावात उपसरपंच निवडीवेळी हाणामारी; ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

googlenewsNext

हाणामारीत गणेश पाटील हे आणखी एक सदस्य गंभीर, तर आठ ते दहा कार्यकर्तेही जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना गुरुवारी (दि. ४) दुपारी दीडच्या दरम्यान घडली. कवठेमहांकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला.

नामदेव पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामपंचायतीमध्ये अकरापैकी आठ सदस्य खासदार पाटील गटाचे, तर तीन सदस्य आमदार पाटील गटाचे आहेत. यातील खासदार पाटील गटाचे दोन सदस्य फोडून आपला उपसरपंच करण्याची रणनीती आमदार पाटील गटाने आखली होती. उपसरपंच निवडीचा कार्यक्रम सुरू होताच ग्रामपंचायत सदस्य मतदानासाठी येत असताना ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांना भिडले. काठ्यांच्या सहाय्याने तुंबळ हाणामारी सुरु झाली. हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग काळे यांना काठ्यांचा मार बसल्याने गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेमुळे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

Web Title: Clashes in Borgaon during sub-panch election; Death of Gram Panchayat member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.