भाऊसाहेब फुंडकर योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान वर्ग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:28 AM2021-03-23T04:28:45+5:302021-03-23T04:28:45+5:30

जत : भाऊसाहेब फुंडकर योजनेतील लाभार्थी म्हणून निवड झालेल्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर वर्ग ...

Classify the grants of the beneficiaries of Bhausaheb Fundkar Yojana | भाऊसाहेब फुंडकर योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान वर्ग करा

भाऊसाहेब फुंडकर योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान वर्ग करा

Next

जत : भाऊसाहेब फुंडकर योजनेतील लाभार्थी म्हणून निवड झालेल्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात यावी या मागणीसाठी जत तालुका मनसेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर साेमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०१९-२० या आर्थिक वर्षात भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून निवड झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय अनुदान अद्याप मिळाले नाही. प्रस्ताव सादर केल्यानंतर त्वरित अनुदान देण्यासाठी तालुका स्तरावर समिती नेमली होती, या समितीने आपला अहवाल अधिकाऱ्यांना सादर केला आहे परंतु अनुदान मिळाले नाही.

यासंदर्भात उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून व निवेदन देऊन अनुदानाची मागणी करण्यात आली होती. परंतु पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अद्याप अनुदान वर्ग करण्यात आलेे नाही. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. योजनेतील निधी तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मनसे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार, जत तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण कोळी, जत तालुका उपाध्यक्ष अजय कुटे, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष मिलिंद टोणे, बलभीम पाटील, सुरेश बिळूर, विनायक माळी, संजय टोणे, नामदेव यादव, मनोज साळे, प्रकाश माने, संतोष खिलारे आदी या लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले होते.

Web Title: Classify the grants of the beneficiaries of Bhausaheb Fundkar Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.