कुंडलवाडी स्मशानभूमीची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:25 AM2021-05-24T04:25:21+5:302021-05-24T04:25:21+5:30
ओळ- कुंडलवाडी, ता. वाळवा येथील स्मशानभूमीत राजकीय पक्षांच्या मंडळींनी स्वच्छता केली. लोकमत न्यूज नेटवर्क तांदूळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) ...
ओळ- कुंडलवाडी, ता. वाळवा येथील स्मशानभूमीत राजकीय पक्षांच्या मंडळींनी स्वच्छता केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तांदूळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जमलेल्या राजकीय पक्षांच्या मंडळींनी हातात झाडू घेत स्वच्छता केली. या उपक्रमाचे गावात कौतुक होत आहे.
कुंडलवाडी येथील स्मशानभूमी ऐतवडे खुर्द रस्त्यास लागून असून ती गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही खराब झाला आहे. स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता झाली होती. गावातील बाळाबाई जयसिंग कदम यांचे निधन झाले. गावात कदम भावकी मोठी आहे. भावकीत प्रत्येकजण राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. हे सर्व कार्यकर्ते अंत्यसंस्कारासाठी जमले होते. स्मशानभूमीतील अस्वच्छता पाहून बाबासाहेब शामराव कदम यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता करण्यासाठी सुरुवात केली. ते पाहून प्रताप लक्ष्मण कदम, विजयकुमार आनंदराव कदम, अजित तानाजी कदम, सागर कदम, सचिन केसरकर, अविनाश कदम, मोहन फाटक हेही मदतीला आले. त्यांनी स्वच्छतेच्या कामाला हातभार लावला. या कामाचे कौतुक होत आहे.