कोटीच्या ठेक्यासाठी नियमांच्या चिंधड्या--तासगाव पालिकेतील प्रकार : सत्ताधाºयांच्या अजब निर्णयाने स्वच्छ शहराच्या योजनेला कोलदांडा--पालिका सदस्यांची मूकसंमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:10 AM2018-01-18T00:10:28+5:302018-01-18T00:12:49+5:30

 Cleansing of rules for the contract of Rs. 25 crore for stamp duty: Due to the unimaginable decision of Tashgaon Municipal Corporation | कोटीच्या ठेक्यासाठी नियमांच्या चिंधड्या--तासगाव पालिकेतील प्रकार : सत्ताधाºयांच्या अजब निर्णयाने स्वच्छ शहराच्या योजनेला कोलदांडा--पालिका सदस्यांची मूकसंमती

कोटीच्या ठेक्यासाठी नियमांच्या चिंधड्या--तासगाव पालिकेतील प्रकार : सत्ताधाºयांच्या अजब निर्णयाने स्वच्छ शहराच्या योजनेला कोलदांडा--पालिका सदस्यांची मूकसंमती

Next

दत्ता पाटील ।
तासगाव : तासगाव नगरपालिकेतील जुन्या सत्ताधाºयांचा नऊ वर्षापूर्वीचा स्वच्छतेचा ठेका रद्द करून नव्या सत्ताधाºयांनी स्वच्छतेचा नवा डाव मांडला आहे. नियमांच्या चिंधड्या उडवित मर्जीतल्या ठेकेदारासाठी रंगविलेल्या कागदांमधून आता अस्वच्छ कारभाराची दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने घुसमट झालेल्या नागरिकांतून पालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

स्वच्छतेच्या ठेक्याच्या आणि गुणवत्तेच्या बाबतीत राज्यभरात नावाजलेल्या बीव्हीजी कंपनीकडे तासगाव नगरपालिकेच्या स्वच्छतेचा ठेका होता. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने तत्कालीन नगराध्यक्ष जाफर मुजावर यांच्या काळात पहिल्यांदाच २००७ मध्ये तासगाव पालिकेने स्वच्छतेचा ठेका बीव्हीजीला दिला होता. तेव्हापासून सहा महिन्यांपूर्वीपर्यंत हा ठेका बीव्हीजीकडे कायम होता. सहा महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभाराºयांनी बीव्हीजीपेक्षा कमी दराने दाखल झालेली निविदा मंजूर केली. कागदोपत्री नियमांचे सोपस्कार पूर्ण करुन शहरातीलच राष्टÑवादीच्या एका पदाधिकाºयाला कोट्यवधी रुपयांचा ठेका देण्यात आला.

वास्तविक ठेकेदाराने कमी दराने निविदा मंजूर करुन घेऊन ठेका पदारात पाडून घेतला. त्यासाठी सत्ताधाºयांशी सेटलमेंट केले. मात्र ठेका घेताना केलेला करारनामा आणि वास्तवदर्शी चित्र यात मोठी तफावत होती. ठेका घेताना अन्य नगरपालिकेकडे एक कोटी रुपयांपर्यंत स्वच्छतेचा ठेका घेऊन काम केल्याचा अनुभवाचा दाखल जोडणे आवश्यक होते. स्वच्छतेसाठी आवश्यक घंटागाड्या, कचरा वाहतुकीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉली, मनुष्यबळ आदी साधनसामग्री आवश्यक होती. मात्र ठेकेदाराने जुन्या मोडकळीस आलेल्या घंटागाड्या वापरात आणल्या.

तुटपुंजे स्वच्छता कामगार कामास ठेवले. यासह अनेक वाहने नसतानादेखील हा ठेका पदारात पाडून घेतला. इतकेच नव्हे, तर ठेक्या घेतल्यानंतर, सहा महिन्यांनी नवीन घंटागाड्या खरेदी केल्या. तोपर्यंत खुलेआमपणे घंटागाड्यांशिवाय स्वच्छतेचे सोपस्कार पाडण्याचे काम सुरु होते.

करारनाम्यातील बहुतांश करार धाब्यावर बसवूनच ठेकेदाराकडून शहरातील स्वच्छतेचे काम सुरु आहे. शहरातील स्वच्छतेच्या तक्रारींबाबत नागरिकांनी नगरसेवकांना हैराण करुन सोडले. त्यानंतर विरोधी राष्टÑवादीच्या नगरसेवकांसह, सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीदेखील नगराध्यक्षांकडे गाºहाणे मांडले. मात्र अद्याप स्वच्छतेच्या कार्यपध्दतीत बदल झालेला नाही. शहरातील मुख्य रस्त्यांचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी, विस्तारित भागात दुर्गंधीचे साम्राज्य आहे.
नियमित स्वच्छता होत नसल्याच्या नागरिकांच्या सातत्याने तक्रारी आहेत. अनेक भागात गटारी तुंबलेल्या आहेत. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणाकडे पालिकेचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

वर्षभरापूर्वी तासगाव नगरपालिकेने हागणदारीमुक्त अभियानात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने तासगाव नगरपालिकेला एक कोटीचे बक्षीस जाहीर केले होते. यावेळी तासगाव नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यात शहरातील स्वच्छतेचे सर्वेक्षण होणार आहे. केंद्र शासनाकडून देशपातळीवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. मात्र शहरातील स्वच्छतेचे डर्टी पिक्चर पाहिल्यानंतर, पालिकेचा या स्पर्धेत टिकाव लागण्याची शक्यता धूसर दिसून येत आहे.

सद्यस्थितीत शहरातील दुर्गंधी, डासांची वाढती घनता आणि त्यामुळे होणारे रोगराईचे साम्राज्य, यामुळे तासगावकर जनता हैराण झाली आहे. सत्ताधाºयांनी तडजोडीने दिलेला स्वच्छतेचा ठेका भाजपसाठी आणि पर्यायाने सत्ताधाºयांसाठी रोषाचा ठरत आहे. विकास नको, पण स्वच्छता करा, एवढीच माफक अपेक्षा व्यक्त होत असताना, सत्ताधाºयांच्या चुकीच्या निर्णयाने स्वच्छ तासगाव आता कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र आहे.


राजकीय तडजोड : पडणार महागात
तासगावच्या जनतेने मोठ्या अपेक्षेने भाजपला नगरपालिकेची सत्ता सोपवली. मात्र सत्ताधाºयांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा फटका जनतेला बसत आहे. राष्टÑवादीच्या पदाधिकाºयाला स्वच्छतेचा ठेका मिळवून देण्यात, बँकेचे कर्ज मिळवून देण्यात, इतकेच नव्हे, तर वाहन खरेदीपासून ठेकेदाराच्या सर्वच प्रक्रियेत सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकाचा पुढाकार होता. केवळ राजकीय सेटलमेंटमुळेच हा ठेका राष्टÑवादीच्या पदाधिकाºयाला देण्यात आल्याची चर्चा खुलेआमपणे तासगावात सुरु आहे. मात्र स्वच्छतेच्याबाबतीत अशीच परिस्थिती राहिली, तर ही तडजोड महागात पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title:  Cleansing of rules for the contract of Rs. 25 crore for stamp duty: Due to the unimaginable decision of Tashgaon Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.