निर्मलसाठी जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींचा खोडा

By admin | Published: November 6, 2014 09:11 PM2014-11-06T21:11:49+5:302014-11-06T22:58:07+5:30

शौचालयांचा अभाव : जिल्हा परिषदेसमोर अभियान पूर्ण करण्याचे आव्हान

For the clearance of the 88 gram panchayats in the district | निर्मलसाठी जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींचा खोडा

निर्मलसाठी जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींचा खोडा

Next

रत्नागिरी : जिल्हा निर्मल होण्यासाठी ८८ ग्रामपंचायतींचा खोडा असून, जिल्ह्यातील साडेतीन हजार कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नसल्याचे पाहणी दरम्यान स्पष्ट झाले आहे. ही शौचालये २०२२ पर्यंत बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्मल भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने समोर ठेवले आहे.
उघड्यावर शौचाला बसणे म्हणजे रोगराईला निमंत्रण देण्याचाच एक भाग आहे. रत्नागिरी जिल्हा निर्मल करतानाच प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक आहे. त्यासाठी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.
इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्हा आरोग्याच्या दृष्टीने फार पुढे आहे. त्यासाठी ग्रामीण भागामध्येही स्वच्छतेला महत्व दिले जाते. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रुपये अनुदान, तर एमआरजीएसमधून १० हजार रुपये अनुदान देण्यात येते.
जिल्ह्यातील किती कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत, याबाबतचा निर्मल भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे साडेतीन हजार कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नसल्याने ही कुटुंबीय सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात, असे पुढे आले होते.
जिल्ह्यातील लांजा आणि गुहागर हे तालुके १०० टक्के हगणदारीमुक्त झाल्याने हे दोन्ही तालुके निर्मल झाले आहेत. पालघर ग्रामपंचायत या एकमेव ग्रामपंचायतीमुळे गुहागर पंचायत समिती निर्मल होण्यास अडचण निर्माण झाली आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत निर्मलग्राम होण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सरपंच, सदस्य यांच्या खास प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यातून त्यांचे प्रबोधनही करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रत्येक घरामध्ये शौचालय असल्यास जिल्हा निर्मल होईल. त्यासाठी जनतेनेही पुढे येणे अवश्यक आहे. (शहर वार्ताहर)

तालुक्यातील निर्मल ग्राम
न झालेल्या ग्रामपंचायती
तालुका ग्रामपंचायती
दापोली१६
खेड१८
चिपळण२८
रत्नागिरी८
संगमेश्वर९
राजापूर८
मंडणगड१

८८ ग्रामपंचायती निर्मल करताना दमछाक
केवळ दोनच तालुके निर्मल
निर्मल नसलेल्या ग्रामपंचायतींचा आकडा पुढे सरकेना
साडेतीन हजार कुटुंबीय वैयक्तिक शौचालयाविना
जनतेकडून सहकार्याची अपेक्षा
स्वच्छतेसाठी प्रबोधनाची आवश्यकता निर्मलग्रामची संकल्पना अधिक ताकदवान व्हावी

Web Title: For the clearance of the 88 gram panchayats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.