इस्लामपूर पालिकेतील लिपिकाचे कोरोनामुळे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:26 AM2021-05-18T04:26:57+5:302021-05-18T04:26:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील नगरपालिकेच्या प्रशासन विभागातील लिपिक अनिल महादेव जाधव (वय ४२) यांचे कोरोनाच्या संसर्गाने सोमवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील नगरपालिकेच्या प्रशासन विभागातील लिपिक अनिल महादेव जाधव (वय ४२) यांचे कोरोनाच्या संसर्गाने सोमवारी पहाटे निधन झाले. येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात बळावल्याने त्यांचे निधन झाले. या घटनेने पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनिल जाधव जवळपास २० वर्षे पालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत होते. गेल्या वर्षभरापासून त्यांची प्रशासन विभागात आवक-जावक लिपिक या पदावर बदली झाली होती. शहरातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ते पालिकेच्या पथकामधून कार्यरत होते. १५ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कामेरी रस्त्यावरील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथील उपचारानंतरही त्यांची प्रकृती बिघडत चालल्याने त्यांना चार दिवसांपूर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना जाधव यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे.
या घटनेने पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.