कुंडलमध्ये उद्यापासून दहा दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:23+5:302021-07-09T04:17:23+5:30
पलूस : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कुंडल ता. पलुस गाव ११ ते २० जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत १०० टक्के ...
पलूस : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कुंडल ता. पलुस गाव ११ ते २० जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत १०० टक्के बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
बैठकीस प्रांताधिकारी गणेश मरकमड, तहसीलदार निवास ढाणे, सरपंच प्रमिला पुजारी, उपसरपंच माणिक पवार, जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, मामासाहेब पवार बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, जि. प. सदस्य शरद लाड आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये गावातील शंभर टक्के व्यवहार बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बंदच्या काळात व्यवहार चालू ठेवल्यास आणि नियमांचा भंग केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दुकानदाराचे परवानेही रद्द करण्यात येणार आहेत. विनामास्क फिरणाऱ्या, गर्दी करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करणार आहे.
कोरोना रुग्णसंख्या जास्त आढळून आलेल्या परिसरातील प्रत्येक घरात कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रागिनी पवार, उपसभापती अरुण पवार, सर्जेराव पवार, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कुंभार, किरण लाड, महारुद्र जंगम, आरोग्य अधिकारी डॉ. किरण भोरे आदी उपस्थित होते.
080721\img-20210708-wa0018.jpg
कुंडल बंद फोटो