दोन दिवसात पुन्हा ढग दाटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:32 AM2021-02-25T04:32:33+5:302021-02-25T04:32:33+5:30
सांगली : जिल्ह्याच्या सरासरी कमाल व किमान तापमानात आता वाढ होत आहे. त्यामुळे आठवडाभरात थंडी गायब होणार आहे. दुसरीकडे ...
सांगली : जिल्ह्याच्या सरासरी कमाल व किमान तापमानात आता वाढ होत आहे. त्यामुळे आठवडाभरात थंडी गायब होणार आहे. दुसरीकडे दोन दिवसात ढग पुन्हा दाटणार आहेत. चार दिवस मुक्काम करून हे ढग निघून जातील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
जिल्ह्यात बुधवारी सरासरी कमाल तापमान ३४, तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. येत्या सहा दिवसात कमाल व किमान तापमानात आणखी अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २६ ते २८ फेब्रुवारी या काळात जिल्ह्याच्या बहुतांश भागात ढग दाटणार आहेत. २९ फेब्रुवारीपासून आकाश पुन्हा निरभ्र होईल. या काळात पावसाची कोणतीही शक्यता नाही. सांगली शहर व परिसरात गत सोमवारी व मंगळवारी ढगाळ वातावरण होते. फेब्रुवारीत लहरी हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागला. पाऊस, धुके, थंडी, ढगांची दाटी अशा प्रत्येक प्रकारच्या वातावरणाचा सामना त्यांना करावा लागला. आगामी काळातही हवामानाच्या लहरीपणाचे दर्शन घडण्याची चिन्हे आहेत.