संघर्षात बिघडले घड्याळाचे काटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:47 AM2018-03-05T00:47:02+5:302018-03-05T00:47:02+5:30

Clutches clockwise in conflict | संघर्षात बिघडले घड्याळाचे काटे

संघर्षात बिघडले घड्याळाचे काटे

googlenewsNext

सांगलीतील राष्टÑवादीची अवस्था : पक्षांतर्गत गटबाजीला उधाण
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : एकमेकांशी पुकारलेले उघड वैरत्व, गटबाजीने सुरू असलेले राजकारण यामुळे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील घड्याळाचे काटे ऐन महापालिका निवडणुकीत बिघडले आहेत. घड्याळाची वेळ बिघडल्यामुळे नेत्यांच्या डोक्यातील चिंतेचे घड्याळ आता टिकटिक करू लागले आहे.
महापालिकेच्या राजकारणात कॉँग्रेसपाठोपाठचा सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्टÑवादीकडे पाहिले जाते. संधी असतानाही नेते, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आपला महापालिका क्षेत्रातील दबदबा वाढविला नाही. गटबाजीचा प्रश्न सोडविण्याऐवजी तो सातत्याने दाबत ठेवल्याने शनिवारी पक्षीय बैठकीत हा वाद अचानक उफाळून आला.
जयंतरावांवर प्रथमच अशाप्रकारच्या उघड गटबाजीला हताशपणे पाहण्याची वेळ आली. त्यांनी निर्णयाचा चेंडू पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे ढकलला असला तरी, महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वत:च्या निर्णय क्षमतेलाच दुर्लक्षित केले. दोन्ही डगरीवरचे त्यांचे हात आता पक्षासाठी अधिक अडचणीचे ठरत आहेत.
संजय बजाज आणि कमलाकर पाटील यांच्या गटातील हा वाद आता इतका विकोपाला गेला आहे की, तो गुंता सोडवणे कठीण बनले आहे. जयंतरावांनी घेतलेल्या फेरनिवडीच्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी कमलाकर पाटील गटाने सुरू केली आहे. व्यक्तिगत वर्चस्ववादातून राष्टÑवादीतील संघर्ष विकोपाला गेला आहे. पक्षाला मोठे करण्यापेक्षा स्वत:ला मोठे करण्याच्या स्पर्धेची कीड राष्टÑवादीला लागली आहे. पक्षाच्या निर्णयाच्या दोºया हाती घेण्यावरून सारे खेळ सुरू झाले आहेत. महापालिकेतही मोठी सदस्य संख्या असूनही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका राष्टÑवादीला साकारता आली नाही. यालाही गटबाजीच कारणीभूत आहे. जाती-पातीच्या राजकारणाचाही स्पर्श याला झाला आहे.
या सर्व गोंधळात निष्ठावंत व गटबाजीपासून दूर असलेले कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. बिघडलेल्या घड्याळातून अनेकदा धोक्याची घंटा वाजली तरीही त्याकडे नेत्यांनी दुर्लक्ष केले. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील राष्टÑवादीचा सर्व भार एकट्या जयंतरावांवर आला आहे. तरीही जयंतरावांनी नेहमी सावध पावलेच उचलली. प्रसंगी कठोर निर्णय घेऊन पक्षासाठी डोकेदुखी ठरू पाहणाºयांना बाजूला करण्याची त्यांची मानसिकता दिसली नाही.
निर्णयक्षमता, अनुभव पाठीशी असतानाही जयंत पाटील यांची कचखाऊ भूमिका त्यांच्याच पक्षासाठी घातक ठरू लागली आहे. त्यांचा शब्द प्रमाण मानणारे कार्यकर्ते आजही पक्षात आहेत. महापालिका क्षेत्रात मदन पाटील यांच्याप्रमाणेच जयंत पाटील यांचीही ताकद आहे, मात्र त्याचा योग्य वापर होताना दिसत नाही. त्यामुळे टिकटिकऐवजी आता किटकिट सुरू झाली आहे. ही किटकिट त्यांचीच डोकेदुखी वाढवत आहे.
पक्षात इनकमिंग : होणार तरी कसे?
राष्टÑवादीत आता मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होणार असल्याचे मत जयंत पाटील यांनी शनिवारी पक्षीय बैठकीत मांडले; मात्र पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण रंगल्यामुळे हे इनकमिंग होणार तरी कसे, असा प्रश्न प्रामाणिक कार्यकर्त्यांना पडला आहे. पक्षात असलेले लोकच एकसंध नसताना, आयात कार्यकर्त्यांना घेऊन पुन्हा अनागोंदी सुरू होण्याचीच चिन्हे अधिक आहेत. वस्तुस्थिती पाहिली तर गेल्या पाच वर्षात राष्टÑवादीचे आऊटगोर्इंग इतके झाले आहे की, इनकमिंगची आशाच कार्यकर्त्यांनी सोडली आहे.
स्वबळाचा नारा दुबळा
गटबाजीने पोखरलेल्या राष्टÑवादीचे बळ केव्हाचेच कमी झाले आहे. सध्याची परिस्थिती पाहता, एकीचे बळ दिसण्याची शक्यता फारच कमी आहे. संघर्षाची धार तीव्र होत जाताना अनेकजण पक्षाला दुबळे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महपाालिका निवडणुकीसाठी राष्टÑवादीने पुकारलेला स्वबळाचा नारा तितकाच दुबळा वाटू लागला आहे.

Web Title: Clutches clockwise in conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.