मुख्यमंत्र्यांची आज सांगलीत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:18 PM2018-10-23T23:18:36+5:302018-10-23T23:18:54+5:30
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, दि. २४ आॅक्टोबररोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी ...
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, दि. २४ आॅक्टोबररोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. जिल्हा प्रशासनासह विविध विभागांच्या अधिकाºयांची त्यासाठी मंगळवारी धावपळ सुरू होती. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेतला.
सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार आहे. दुपारी तीनपर्यंत विविध विभागांचा आढावा घेतला जाणार आहे. सुरुवातीला राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि त्याबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर शासनाच्या विविध शासकीय योजनांची सद्यस्थिती ते जाणून घेणार आहेत. योजनांसाठी दिलेला निधी, झालेला खर्च व अडचणी याबाबत ते अधिकाºयांशी चर्चा करणार आहेत. यासाठी सर्वच विभागप्रमुखांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे. तालुकास्तरीय सर्व प्रमुख अधिकाºयांनाही उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री आवास, उज्ज्वला योजना, महात्मा गांधी राष्टÑीय रोहयो, मुख्यमंत्री सडक योजना, पेयजल, जलयुक्त शिवार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुद्रा योजना अशा विविध योजनांबाबतची माहिती संकलित करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी पोलीस दलाची बैठक आयोजित केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा आढावा तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा आढावा घेणार आहेत. महापालिका व जिल्हा परिषद यांचाही आढावा यावेळी घेण्यात येणार आहे. महापालिकेसाठी एक तास वेळ दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या दौºयासंदर्भातील तयारी व धावपळ सुरू होती. योजनांबाबतचे अहवाल तयार करण्याचे काम दिवसभर सुरू होते. खातेप्रमुखांपेक्षा ते थेट अधिकाºयांशी संवाद साधणार आहेत. सर्व माहिती अपडेट ठेवण्यासाठी अधिकाºयांची मंगळवारी दिवसभर लगबग सुरू होती.
सकाळी पावणेअकरा वाजता कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरणार आहे. तेथून ते मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयात येणार आहेत. या बैठकीस पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत. दौºयाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेतला.
पोलीस यंत्रणा सज्ज
मुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. कवलापूर ते सांगली व तेथून विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बुधवारी पहाटेपासून रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाºया प्रत्येक व्यक्तीची चौकशी करून सोडण्यात आले.