सहकारी बँकांचा रेकॉर्ड ब्रेक व्यवसाय सांगली जिल्ह्यातील चित्र : तब्बल ८५ कोटींचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 10:18 PM2018-05-11T22:18:42+5:302018-05-11T22:22:35+5:30

आटपाडी : सांगली जिल्ह्यातील सर्व सहकारी बॅँकांनी २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. बँकांनी एकूण ८४ कोटी ८१ लाख रुपये एवढा नफा मिळविला आहे.

 Co-operative Banks Record Break Business Picture of the District: Profit of 85 crores in the financial year | सहकारी बँकांचा रेकॉर्ड ब्रेक व्यवसाय सांगली जिल्ह्यातील चित्र : तब्बल ८५ कोटींचा नफा

सहकारी बँकांचा रेकॉर्ड ब्रेक व्यवसाय सांगली जिल्ह्यातील चित्र : तब्बल ८५ कोटींचा नफा

googlenewsNext

अविनाश बाड।
आटपाडी : सांगली जिल्ह्यातील सर्व सहकारी बॅँकांनी २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. बँकांनी एकूण ८४ कोटी ८१ लाख रुपये एवढा नफा मिळविला आहे. जिल्ह्याच्या सहकारी बॅँकांच्या इतिहासात प्रथमच तब्बल ९ हजार १६७ कोटी २६ लाखांचा रेकॉर्ड ब्रेक व्यवसाय केला आहे.

सांगली जिल्ह्यात सहकार क्षेत्राने मजबूत जाळे विणले आहे. ग्रामीण भागात त्याचा प्रभाव आहे. जिल्ह्याच्या सर्व ग्रामीण सहकारी बॅँकांनी जाळे पसरून, ज्यांना समाजात पत नाही, किचकट कागदपत्रे ज्यांच्याजवळ नाहीत, आयकर भरण्याची ऐपत नाही, अशांनाही आर्थिक मदत करून त्यांना ताठ मानेने समाजात उभे करण्यास मदत करत आहेत.

जिल्ह्यातील सर्व सहकारी बॅँका यंदा नफ्यात आहेत. बॅँकांनी ४१ कोटी २ लाख एवढा निव्वळ नफा कमविला आहे. बॅँकांच्या २५४ शाखा आहेत. बॅँकांमध्ये ठेवींचे प्रमाण वेगाने वाढत आहे. सध्या बॅँकांमध्ये ५ हजार ३९५ कोटींच्या ठेवी आहेत. या बॅँकांनी १५०० कोटींचे डिपॉझिट रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाकडे केले आहे. १७८५ कोटी ६५ लाखांची गुंतवणूक केली आहे, तर ३ हजार ७७२ कोटी ३ लाख रुपयांची कर्जे दिली आहेत.

बॅँकांकडे ४११ कोटी ६४ लाख एवढा स्वनिधी आहे. बॅँकांकडे २०७ कोटी ८४ लाख एवढे भागभांडवल आहे. बँकांचा सी. आर. ए. आर. १५१६ टक्के एवढा सर्वोत्तम आहे. सर्व बॅँका आता आॅनलाईन व्यवहार करत आहेत. त्या संगणकीकृत झाल्या आहेत. बँकांनी १७८५ कोटी ६७ लाखांची एकूण गुंतवणूक करून भक्कम आर्थिक स्थैर्याकडे घोडदौड सुरू केली आहे.

Web Title:  Co-operative Banks Record Break Business Picture of the District: Profit of 85 crores in the financial year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.