रस्त्याचा नारळ फोडून नेते, अधिकारी झाले गायब; सांगली-तुंग रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:26 AM2018-10-04T00:26:39+5:302018-10-04T00:26:42+5:30

The coconut breakers and officials are missing; The plight of Sangli-Tung road | रस्त्याचा नारळ फोडून नेते, अधिकारी झाले गायब; सांगली-तुंग रस्त्याची दुर्दशा

रस्त्याचा नारळ फोडून नेते, अधिकारी झाले गायब; सांगली-तुंग रस्त्याची दुर्दशा

Next

सांगली : श्रेयवादाचा लाडू चाखत भाजपच्या नेत्यांनी सांगली-तुंग रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा प्रारंभ काही दिवसांपूर्वी केला. नारळ फोडून नेते गायब झाले आणि अधिकारीही फिरकले नसल्याने, या रस्त्याची दुर्दशा तशीच कायम आहे. परिसरातील नागरिक, प्रवाशांचे हाल अद्याप सुरू असून, यासंदर्भात आवाज उठविणाऱ्या नागरिक जागृती मंचने, नेते गेले कुठे, असा सवाल उपस्थित केला आहे.
‘लोकमत’ने याप्रश्नी आवाज उठविल्यानंतर नेते, अधिकारी खडबडून जागे झाले. नागरिक जागृती मंचने गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन केले. शेवटी या गोष्टीची दखल घेत शासनाला हा रस्ता राष्टÑीय महामार्गात समाविष्ट करावा लागला. रस्त्याचे तीन टप्प्यातील काम सुरू होते. दोन टप्पे पूर्ण झाले असले तरी, सांगली-तुंग हा पट्टा अद्याप दुरुस्त झालेला नाही. प्रचंड नरकयातना सहन करीत प्रवासी या रस्त्यावरून ये-जा करीत आहेत. याप्रश्नी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेत अधिकाºयांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर रस्ते कामास तातडीने सुरुवात करण्याचा निर्णय झाला. भाजपचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व अन्य नेत्यांनी या रस्तेकामाचा नारळ थाटात फोडला. त्यासाठी मोठा कार्यक्रम घेऊन निधी आणल्याचा गाजावाजा केला.
उद्घाटनानंतर दुसºयादिवशी लगेच कामास सुरुवात होईल, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र या रस्त्याने त्यानंतर ना खडी पाहिली ना डांबर. होते ते खड्डे अधिकच अक्राळ-विक्राळ रुप धारण करून लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत. तत्परतेने उद्घाटनांचा कार्यक्रम होत असताना, तितक्याच तत्परतेने कामे का सुरू होत नाहीत?, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.
सुरुवातीला पॅचवर्क करून, महिनाभर पावसाळ्यासाठी प्रवाशांची सोय करण्यात येईल, त्यानंतर मंजूर निविदेप्रमाणे साडेसहा कोटी रुपयांच्या कामास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पॅचवर्क सुरू झाले. पॅचवर्क झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच मुख्य कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घाईगडबडीत भाजप नेत्यांनी आयोजित केला.
राजकीय आरोप-प्रत्यारोप करून सर्व औपचारिकता पार पाडण्यात आली. निधी आणण्यासाठी कोणी किती कष्ट घेतले, याची कथाही सांगण्यात आली. पण या सर्व गोष्टी पोकळ ठरल्या.
सर्व नेते गेले कुठे? : सतीश साखळकर
नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर म्हणाले की, थाटात उद्घाटन करणारे, सेल्फी घेऊन नंतर त्याचे श्रेय लाटणारे सारे नेते आता गेले कुठे? राजकारण करण्यासाठी कामे न करता उत्तरदायीत्व म्हणून काम करायला राजकारण्यांनी शिकावे. लोकांचे हाल काय होतात, याची कल्पना नेत्यांना नाही. त्यामुळे गेली कित्येक वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता. कोणी निधी आणल्याचा गाजावाजा करीत आहे, तर कुणी सेल्फीचा परिणाम झाल्याचे सांगत आहे. या गोष्टी या नेत्यांना अगोदर का सुचल्या नाहीत? लोकांना फसविण्याचे उद्योग आता बंद करावेत.

Web Title: The coconut breakers and officials are missing; The plight of Sangli-Tung road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.