वाळवा व नागठाणे येथे ताबूत विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:31 AM2021-08-21T04:31:21+5:302021-08-21T04:31:21+5:30
वाळवा : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला व शेकडो वर्षांपासून साजरा केला जाणारा वाळवा व नागठाणे येथील मोहरम (आलावा) साेहळा ...
वाळवा : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला व शेकडो वर्षांपासून साजरा केला जाणारा वाळवा व नागठाणे येथील मोहरम (आलावा) साेहळा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशानुसार साधेपणाने पार पडला.
मोहरमनिमित्त मुस्लिम समाजाच्यावतीने पाच सवारींचे पंजे बसविण्यात आले होते. वाळवा येथे कोटभाग मस्जीद, फकीर गल्ली, मधला मारूती मंदिरजवळ, पेठभाग येथे कोठीजवळ, सय्यद बार मस्जीद, बंगाल बाबा दर्गा, नुरानी मस्जीद, खेड रस्ता येथे ढोले, पंजे, ताबूत बसवले होते. नागठाणे येथे पाच पंजे बसविण्यात आले होते.
खतल रात्री खाई पेटवून उड्या मारणे, नैवेद्य, करबल खेळणे आदी कार्यक्रम झाले. नागठाणे येथे नागेश्वर मंदिराजवळ तर वाळवा येथे कोटभाग जुन्या चावडीजवळील मस्जीद येथे पंजांच्या भेटी झाल्या. गुरूवारी रात्री ताबूत व पंजे कृष्णा नदीतीरावर विसर्जित करण्यात आले.