‘मागेल त्याला शेततळे’ पलूस तालुक्यात मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 04:01 PM2019-05-25T16:01:00+5:302019-05-25T16:02:47+5:30

शासनाच्या जाचक अटी आणि तुटपुंजा मदतीमुळे, ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना शेतकºयांच्यादृष्टीने फलदायी ठरत नसल्याचे चित्र पलूस तालुक्यात आहे

'Come to the farmland' in the Palas taluka! | ‘मागेल त्याला शेततळे’ पलूस तालुक्यात मिळेना!

‘मागेल त्याला शेततळे’ पलूस तालुक्यात मिळेना!

Next
ठळक मुद्देयापैकी विविध चाचण्यांतून पात्र ठरत केवळ ३५ शेततळ्यांचे काम झाले आहे.  

अशुतोष कस्तुरे  । 
कुंडल : शासनाच्या जाचक अटी आणि तुटपुंजा मदतीमुळे, ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना शेतकºयांच्यादृष्टीने फलदायी ठरत नसल्याचे चित्र पलूस तालुक्यात आहे. त्यामुळे या योजनेतून शेतकºयांचा सर्वांगीण विकास कसा साधणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्य शासनाकडून शेततळे काढण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. मात्र या अनुदानाच्या तीनपट अधिकचा खर्च शेतकºयाला स्वत:च्या खिशातून करावा लागत आहे. परिणामी पलूस तालुक्यात शेतकºयांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे.

योजनेचे नावच ‘मागेल त्याला शेततळे’ असे असल्याने, सुरुवातीला शेतकरी उत्साहाने आपले नाव कृषी विभागाकडे नोंदवतात. मात्र जसजशी कागदपत्रे पुढे जातील, तसतसा शेतकºयांचा भ्रमनिरास होतो. परिणामी वाढीव खर्च पाहून शेतकरी या योजनेतून काढता पाय घेतो. २०१५-१६ मध्ये ही योजना अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत तीन वर्षांत केवळ २५५ अर्ज शेततळे मागणीसाठी आले. यापैकी विविध चाचण्यांतून पात्र ठरत केवळ ३५ शेततळ्यांचे काम झाले आहे.  
 

Web Title: 'Come to the farmland' in the Palas taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.