दिलासादायक...जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्णसंख्या शंभराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:29 AM2021-09-26T04:29:37+5:302021-09-26T04:29:37+5:30

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत शनिवारी मोठा दिलासा मिळताना, प्रथमच शंभराखाली ९८ रुग्णांची नोंद झाली. मृत्यूसंख्याही घटताना जिल्ह्यात ...

Comfortable ... The number of new corona patients in the district is below one hundred | दिलासादायक...जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्णसंख्या शंभराखाली

दिलासादायक...जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्णसंख्या शंभराखाली

Next

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत शनिवारी मोठा दिलासा मिळताना, प्रथमच शंभराखाली ९८ रुग्णांची नोंद झाली. मृत्यूसंख्याही घटताना जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात १३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. म्युकरमायकोसिसचे मात्र, दिवसात नवीन ५ रुग्ण आढळले.

गेल्या आठवड्यापासून दीडशेवर असलेल्या रुग्णसंख्येत घट होत शंभराखाली बाधित आढळले.

जिल्ह्यातील ८ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली १, पलूस, जत प्रत्येकी २, खानापूर, तासगाव, मिरज तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

शनिवारी आरटीपीसीआर अंतर्गत २८८८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ५७ जण बाधित आढळले तर रॅपिड ॲंटिजनच्या ३५२७ जणांच्या नमुने तपासणीतून ४१ जण पॉझिटिव्ह आढळले.

उपचार घेत असलेल्या ८४० जणांपैकी २६३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १९३ जण ऑक्सिजनवर तर ७० जण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १९७७५७

उपचार घेत असलेले ८४०

कोरोनामुक्त झालेले १९१६५७

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५२६०

Web Title: Comfortable ... The number of new corona patients in the district is below one hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.