सांगलीतील पहिल्या काँक्रिट रस्त्याच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:52+5:302021-03-19T04:25:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली शहरातील राम मंदिर ते सिव्हिल हॅास्पिटल या पहिल्या काँक्रिट रस्त्याच्या कामास गुरुवारी सुरुवात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली शहरातील राम मंदिर ते सिव्हिल हॅास्पिटल या पहिल्या काँक्रिट रस्त्याच्या कामास गुरुवारी सुरुवात झाली. या कामाची पाहणी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केली.
सांगलीतील पहिला ट्रीमिक्स रस्ता म्हणून राममंदिर ते सिव्हिल रस्ता केला जात आहे. यासाठी दीड कोटींचा खर्च केला जात आहे. हा रस्ता पहिल्यापेक्षा दीड फूट उंच असणार आहे. याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा ड्रेनेज व अन्य केबलसाठी स्वतंत्र पाईप टाकण्यात आल्या आहेत. यामुळे कोणत्याही कारणासाठी हा रस्ता उकरण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच या रस्त्यावर पावसाचे पाणीही साचणार नसल्याने हा रस्ता अनेक वर्षे खराब होणार नाही. आजपासून ट्रीमिक्स काँक्रिटीकरण कामाला सुरुवात झाली असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सांगलीतील हा पहिला ट्रीमिक्स पद्धतीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या कामाची पाहणी आयुक्त कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता देसाई यांनी केली.